लघुशंकेसाठी ट्रॅक्‍टर थांबविणे बेतले जीवावर

accident
accident

मेहुणबारे (ता.चाळीसगाव) ः लघुशंका करण्यासाठी ट्रॅ्क्टर रस्त्याच्या कडेला उभे करणे मजुराच्या जीवावर बेतले. उभ्या ट्रॅ्क्टरला भरधाव वाहनाने धडक दिल्याने मध्यप्रदेशातील मजुराचा मृत्यु झाल्याची घटना आज घडली. दरम्यान दोन दिवसांपुर्वी याच रसत्यावर भिषण आपघात होऊन दोन तरुण ठार असल्याची घटना ताजी असतांना पुन्हा आज या रस्‍त्यावर एकाचा अपघाती मृत्यु झाला.

कन्नड तालु्क्यातील भांबरवाडीजवळ कन्नड रस्त्याचे कामाचे ठिकाणी (एमएपी. 04 एएच. 9664) हे ट्रॅ्क्टर भोपाळहून लोखंडी पाईप भरून कन्नडकडे जात असताना रविवारी (ता.12) रोजी रात्री नऊच्या सुमारास मेहूणबारे येथे जामदा फाट्याच्यापुढे  ट्रॅ्क्टर चालक सुरेशकुमार रामबिहारी कुशवाह याने लघुशंकेसाठी ट्रॅ्क्टर रस्त्याच्या कडेला थांबवले. त्यावेळी गोवर्धन धनीराम पटेल, मजूर शफीकखान रशिदखान हे रस्त्याच्या बाजुने लघुशंकेसाठी गेले; तर किशोरीलाल कोमत रेकवार (वय 21, रा.धाम जमुनिया राधापूर ता. सामररा जि. टिकमगड) हा ट्रॅ्क्टरच्या मडगार्डवर बसलेला होता. त्यावेळी धुळेकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या मालवाहू वाहनाने उभ्या असलेल्या ट्रॅ्क्टरच्या ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. त्यात ट्रॅ्क्टरसह ट्रॉली रस्त्याच्या कडेला उलटले. त्यात किशोरीलाल रैकवाल ट्रॅ्नटरवरून फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला व तोंडाला मार लागला. ट्रॅ्क्टरला धडक दिलेले मालवाहू वाहन अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. तर अपघाताचे स्वरूप पाहून ट्रॅ्क्टरचालक सुरेशकुमार रामबिहारी कुशवाह हा देखील पळून गेला. गोवर्धन पटेल याच्यासह इतरांनी जखमी किशोरीलाल यास रस्त्याने जाणाऱ्यांच्या मदतीने मेहूणबारे ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यास तपासले असता त्याचा मृत्यु झाल्याचे सांगितले. याप्रकरणी ट्रॅ्क्टर व ट्रालीस धडक देवून पळ काढणाऱ्या अज्ञात ट्रक चालकाच्या विरोधात मेहूणबारे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com