महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार  

महामार्गात गेलेल्या जमिनीचा मोबदलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार  

पारोळा ः शहराच्या बाहेरून गेलेल्या महामार्गात 52 शेतकऱ्यांना दुसऱ्या हप्त्याचे पैसे न मिळाल्यामुळे माजी गोविंद शिरोळे यांच्यासह 52 शेतकऱ्यांच्या परिवारांनी महामार्गा वरील रस्त्याचे सुरु असलेले काम बंद करुन ठिय्या मांडून आम्हाला दुसरा हप्ता दया नंतरच काम सुरू करा अशी मागणी करून भरउन्हात दिड ते दोन तास ठिय्या आंदोलन केले.

आंदोलन मिटत नसल्याचे बघून पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून आंदोलक शेतकऱ्यासह महिलांना पोलिस व्हॅन मध्ये टाकून पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्याने शेतकऱ्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.ता,10 रोजी सकाळी 11 वाजे पासुन माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे यांच्या सह महिला व शेतकऱ्यांनी नविन महामार्ग चौपदरी काम दुसरा हप्ता मिळत नसल्यामुळे काम बंद करून ठिय्या आंदोलन केले यावेळी माजी गोविंद शिरोळे यांनी सांगितले की, नविन महामार्गावरील चौपदरीकरण करणे कामी शहरातुन जाणारा वळण रस्ता ( बायपास ) करण्यासाठी आमची सुरु असलेली शेती बंद करुन शासनाने रुंदीकरणासाठी जामिनी संपादित करुन कामे सुरू केलेले असुन सदर काम करतांना शहराबाहेरुन वळण रस्ता जाताना शहराच्या डाव्या बाजूला व विचखेडे शिवारातुन जाणारा वळण रस्त्याच्या थकीत मंजूर संपादित जमिनीचा मोबदला अगोदरच दिला गेला आहे.

हप्ता का मिळत नाही

फक्त वळण रस्त्यावरील 52 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता मिळत नाही. इतर शेतकऱ्यांना दुसरा हप्ताही मिळाला मग आम्हा 52 शेतकऱ्यांना दुसरा हप्ता का मिळत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. आता पर्यंत आठ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून अजून किती जणाचा बळी जाण्याची वाट बघणार आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे अशी मागणी यावेळी केली. ठिय्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, विमल शहा , दिलीप वाणी , यांच्या सह शेतकरी व महिला मुला बाळा सह सहभागी झाले होते.

जळगाव

संपादन- भूषण श्रीखंडे


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com