esakal | कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आमदार पोहचले तहसील कार्यालयात 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आमदार पोहचले तहसील कार्यालयात 

महसुल पालिका व पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई बाबत नियोजन करावे.यासाठी सामुदायीक प्रयत्न करण्याची गरज आहे.

कोरोनाचा आढावा घेण्यासाठी आमदार पोहचले तहसील कार्यालयात 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा ः कुठेतरी एक महीन्यापासुन परिस्थिति नियंत्रणात आली असतांना मात्र ऐन सणासुदीच्या काळात गर्दी व समुह संपर्क वाढल्याने कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. पारोळा तालुक्यात प्रभावी अंमलबजावणी करुन, प्रत्यक्ष कृती करण्याच्या सुचना आज आमदार चिमणराव पाटील यांनी दिल्या. कोरोना बाबत तयारीचा आढावा घेण्यासाठी तहसिल कार्यालयात जावून त्यांनी आढावा घेतला. 


वाचा- पर्यटनस्थळ खुलण्याची शक्यता मावळली 

यावेळी प्रांतअधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अनिल गवांदे, पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डाँ प्रांजली पाटील, डॅा. योगेश साळुंखे, व्यापारी महासंघाचे केशव क्षत्रिय,शहर तलाठी निशिकांत पाटील, नायब तहसिलदार आर. बी. शिंदे, मिलिंद मिसर, नगरसेवक नितीन सोनार, नगरसेवक मनोज जगदाळे, शिवसेना शहर प्रमुख अशोक मराठे, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, महेश हिंदुजा, शेवगेचे माजी सरपंच सदाशिव पाटील, पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक संघमित्रा संदानशिव,आरोग्य निरीक्षक तुकडु नरवाळे यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

वातावरण बदलाची आवश्यकता आहे.
पुढची लाट येईल हे गृहीत धरुन काम करण्याची गरज आहे.राजधानी दिल्लीत भयानक परिस्थिति आहे. यासाठी प्रशासनाने समाजात जागृतता आणण्याची गरज आहे. शिवसेनेकडून गावावामध्ये माॅस्क लावण्यासाठी जनजागृती केली जाईल. तसेच प्रत्येकाने मास्क, सॅनिटायझर चा वापर करण्याची गरज असल्याचे आमदारांनी सांगितले.

विना मास्क 200 रु दंड आकारा 
तालुक्यात किंवा ग्रामीण भागात विना मास्क फिरणार्यांना 200 रु दंड आकारण्याची सुचना आमदार चिमणराव पाटील यांनी केली. याबाबत महसुल पालिका व पोलिस प्रशासनाने दंडात्मक कारवाई बाबत नियोजन करावे.यासाठी सामुदायीक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यावेळी बैठकित नगरसेवक नितीन सोनार यांनी विना मास्क फिरणार्या दंडात्मक कारवाईची सुचना केली.


संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top