मध्‍यरात्रीचा थरार...गाडी अडवून केला वार; नंतर गाडीसह माल घेवून पोबारा

murder
murder

पारोळा : करंजी (ता. पारोळा) परिसरात शुक्रवारी मध्यरात्री रस्त्यालगत एका पन्‍नास वर्षीय चालकाचा खुन करण्यात येवुन त्याच्या ताब्यातील वाहनासह एकुण सहा लाखाचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. रस्‍त्‍यावर अशा प्रकारची घटना घडल्‍याने गाडीच्या मागावर कोणीतरी असावे असाच संशय वर्तविला जात आहे.

करंजी (ता. पारोळा) येथे घडलेल्‍या घटनेबाबत तानाजी खंडेराव जोधंळे (रा. जऊळके, जि. नाशिक) व्यवसाय माल वाहतुक ट्रान्सपोर्ट यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या मालकिची स्वराज माझा गाडी (क्र. एम.एच. १५ ईजी ५६७१) हिच्यावर मागील दोन महीन्यापासून त्यांच्या गावातील द्वारका सुकराम जाधव (वय ५०) हा चालक म्हणुन कामास होता. ६ आँगस्टला द्वारका जाधव वाहन बाफना वेअर्स हाऊस जऊळके येथुन बर्जर कंपनीचे खोके घेवुन पारोळा व जळगाव येथे माल देण्यासाठी निघाला होता. शुक्रवारी (ता.७) पारोळा येथुन माल देवुन जळगांव येथील संबंधीताचा माल पोहच करत जळगांव येथुन बाहेती ट्रान्सपोर्ट या दलालमार्फत जळगाव एमआयडिसीमधील ओम इंडस्ट्रीजमधुन नाशिक येथील पार्टीला माल देण्यासाठी १२५ दाळीचे कट्टे यांचा बाजारभाव ३ हजार ७५० किलो असा एकुण ३ लाख रुपये किमतीचा माल भरुन द्रारका जाधव सायंकाळी सहाला परतीचा मार्गावर निघले होते. यावेळी त्याने माझ्यासह त्याच्या पत्नीशी भ्रमणध्वनीद्वारे संवाद साधला होता.

फोन बंद आल्‍याने झाली शोधाशोध
दरम्‍यान आज सकाळी त्याच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद मिळुन आला. यामुळे त्याच्या पत्नीस विचारले असता त्यांनीही रात्रीपासुन माझा त्यांच्याशी संपर्क नसल्‍याचे सांगितले. यानंतर द्रारका जाधव यांचे नातेवाईक विजय केसरी यादव यांना सोबत घेवुन शोध घेतला असता पारोळा तालुक्यातील करंजी शिवारात एक पुरुष जातीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्ष घटनास्थळी पोहचुन मृतदेहाची शहानिशा केली असता तो मृतदेह द्वारका जाधव याचा असल्‍याचे निदर्शनास आले. द्वारका जाधव यांच्या गळ्यावर, पोटावर धारधार चाकुने अनेक वार करुन खुन केल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसुन आले. यावेळी पारोळा पोलिसांनी घटनास्थळापासुन १३५ फुटावर रक्तांने माखलेला धारधार चाकु शोधुन काढला. द्वारका जाधव याच्या ताब्यातील गाडीसह ३ लाख रुपये किंमतीचे दाळीचे कट्टे असा एकुण ६ लाखाचा ऐवज चोरी झाल्याची व द्वारका जाधव याचा खुनाची फिर्याद दिली. याबाबत पुढील तपास पो.नि.लिलाधर कानडे,सपोनि निलेश गायकवाड करित आहे.

पोलिसांसमोर आवाहन 
सदर गंभीर घटनेबाबत माहीती मिळताच चाळीस अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गोरे,अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी सौरभ अग्रवाल,स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक तसेच श्वान पथक व मोबाईल व्हँन आदी पथक दाखल होवुन राष्ट्रीय महामार्ग सहावरिल सर्व बाजुंनी तपास सुरु केला होता.याबाबत मयताचे नातेवाईक व मालक यांनी पारोळा पोलिसात भेट दिली होती.

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com