esakal | आमदारांच्या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेने उपोषण घेतले मागे 
sakal

बोलून बातमी शोधा

आमदारांच्या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेने उपोषण घेतले मागे 

पालकमंत्री यांच्यासह शासनाशी बोललो असून सरसकट मदती साठी प्रयत्नशील असून अति वृष्टीचा निकष 2018-19 चा लावण्याबाबत चर्चा सुरू आहे.

आमदारांच्या आश्वासनानंतर शेतकरी संघटनेने उपोषण घेतले मागे 

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : येथील तहसील कार्यालयाच्या आवारात शेतकरी संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करत आमदार चिमणराव पाटील, जी प सदस्य डॉ हर्षल माने,प्रांत विनय गोसावी यांना निवेदन देत उपोषणाची सांगता केली.

आवश्य वाचा- शेतकऱ्यांसाठीच घेतली होती संघर्षाची भूमिका - आमदार चव्हाण -

यावेळी केलेल्या मागण्या मध्ये तालुक्याचा समावेश सौर कृषी पंप योजनेत करावा,अति वृष्टी मुळे नुकसान झालेल्या कापूस,मका,ज्वारी,बाजरी या पिकांना दुष्काळी मदत देण्यात यावी,कापूस पिकांवर लाल्या रोग व बोड अळी अश्या संकटात त्याचाही विचार व्हावा ,सदर कापूस पिकास पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ देऊन जास्तीत जास्त विमा मंजूर करण्यात यावा ,नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान किंवा परतावा द्यावा,तालुका कृषी अधिकारी हे नियमित द्यावे प्रभारी नको अश्या मागण्या करण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे डॉ. पृथ्वीराज पाटील, किशोर पाटील, सुनील देवरे, भिकनराव पाटील ,संजय वाल्हे ,जितेंद्र वानखेडे, भुषण पाटील,भाऊसाहेब सोनवणे,राहुल पाटील,

शेतक्रऱयांना सरसकट मदतसाठी प्रयत्नशील 
यावेळी आमदार चिमणराव पाटील म्हणाले, की मी पालकमंत्री यांच्यासह शासनाशी बोललो असून सरसकट मदती साठी प्रयत्नशील असून अति वृष्टीचा निकष 2018-19 चा लावण्याबाबत चर्चा सुरू असून नियमित तालुका कृषी अधिकारी बाबत वरिष्ठांना सुचना करित नियमित कर्ज धारकाना प्रोत्साहन अनुदान बाबत जिल्हा बैठकीत विषय घेऊ असे आश्वासन दिले.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top