esakal | कुटूंब घराच्या गच्चीवर..आणि चोरट्यांची घरात हातसफाई
sakal

बोलून बातमी शोधा

कुटूंब घराच्या गच्चीवर..आणि चोरट्यांची घरात हातसफाई

कुटूंब घराच्या गच्चीवर..आणि चोरट्यांची घरात हातसफाई

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा ः येथील म्हसवे शिवारातील कॅप्टन नगर येथे चोरट्यांनी (Thief) दोन घरफोडीच्या घटना रात्री (night) घडल्या. या घटनेत लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला असून याबाबत पारोळा पोलिस ठाण्यात (Parola Police Station) गुन्हाची नोंद करण्यात आली आहे.

(parola thieves stole millions rupees two houses)

हेही वाचा: लॉकडाउनच्या काळात ‘मनरेगा’ ठरतेय मजुरांसाठी जीवनदायी

म्हसवे शिवारातील कॅप्टन नगर येथील रहिवासी व नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी वसंत छगन चव्हाण हे त्यांच्या घराच्या छतावर कुटुंबासह झोपले असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी पुढील दरवाज्याचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून लोखंडी गोदरेज कपाटात ठेवलेले एक लाख रुपये रोख,दोन तोळे सोने कानातले टोंगल 13 ग्रॅम, काप 7 ग्रॅम असे व 200 ग्रॅम चांदी असा एकूण सव्वा दोन लाखांचा डल्ला चोरट्यानीं मारला तर त्याच घराच्या मागे राजेंद्र गिरधर केदार मूळ गाव लोणी ता पारोळा हल्ली मुक्काम कॅप्टन नगर हे त्यांचे वडील मयत झाल्याने घराला कुलूप लावून गावी लोणी येथे गेलेले असतांना त्यांच्या बंद घराच्या पुढच्या दरवाजाचे कडी कोयंडा तोडून घरातील लोखंडी कपाटातील 10 हजार रुपये रोख व चांदीची मूर्ती व दोन ,दोन भारचे चांदीचे गोट असे एकूण 20 हजारांचा ऐवज चोरीस गेला आहे.

हेही वाचा: पाटाच्या पाण्यात दोन अल्पवयीन मुलांचा बुडुन मृत्यु !

घटनास्थळी पोलिस..

पोलिसांना पाचारण करून घरफोड्या झालेल्या घटनास्थळी पोलीस निरीक्षक संतोष भंडारे,उपनिरीक्षक दिव्या दातीर, हवलदार सुनील वानखेडे,राहुल पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली त्यानंतर निरीक्षक भंडारे यांनी श्वान पथक व फिंगर प्रिंट पथकाला बोलावून ठसे घेतले तर श्वान हे चव्हाण यांच्या घरातून निघत राजू केदार यांच्या घरात घुसून पूर्ण घर फिरून सरळ दादाजी हॉटेल समोरील महामार्गाकडे मार्ग दाखविला.याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात येवुन तपास पोलिस करित आहे.

(parola thieves stole millions rupees two houses)