esakal | अरे देवा..शटर बंद आणि शाॅपिंग मॅाल मध्ये ग्राहकांची जत्रा !

बोलून बातमी शोधा

अरे देवा..शटर बंद आणि शाॅपिंग मॅाल मध्ये ग्राहकांची जत्रा !
अरे देवा..शटर बंद आणि शाॅपिंग मॅाल मध्ये ग्राहकांची जत्रा !
sakal_logo
By
दिलीप वैद्य

रावेर : येथील रुपम या 3 मजली शॉपिंग मॉल (rupam shopping moll) वर आज पोलिस (raver police) आणि पालिका यांनी केलेल्या कारवाईत कोरोना (corona) नियमांची ऐसीतैशी झालेली आढळून आली. या दुकानात बाहेरून शटर बंद करून आत सुमारे १७५ ग्राहक आणि कर्मचारी आढळून आले. या कारवाई मुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ( raver breaking rules closed shopping malls police action crowds customers )

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रात सज्जता

येथील रावेर पीपल्स बँकेजवळ रुपम हा ३ मजली शॉपिंग आहे. बाहेरगावाहून येऊन याचे मालक आपल्या किमान ३० कर्मचाऱ्यांसह चोरून लपून व्यवसाय करीत होते. कोरोना नियमात रेडिमेड कपड्यांची दुकाने उघडी ठेवण्याचे आदेश नसतांना मास्क, सोशल डिस्टनसिंग, सॅनिटाइझर आदींचे नियम धाब्यावर बसवून हा व्यवसाय सुरु होता. पालिकेचे मुख्याधिकारी रवींद्र लांडे आणि हेड कॉन्स्टेबल भागवत धांडे यांनी पालिका कर्मचारी, पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाच्या मोठ्या ताफ्यासह दुकान शिरून कारवाई केली. यावेळी सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांचे चित्रीकरण करून नांवे लिहिण्यात आली. आत सुमारे १७५ जण होते.

हेही वाचा: जळगाव जिल्ह्यात मुद्रांकांचा तुटवडा; कामे खोळंबली !

शहरात अशा प्रकारची बंदी असतांना अनेक दुकानदार अशा प्रकारे चोरून व्यवसाय करत असल्याचे वृत्त सकाळने प्रसिद्ध केले होते. पोलिस आणि पालिकाही त्यावर नजर ठेवून होते. अशा प्रकारच्या धडक कारवाईचे स्वागत होत आहे. कारवाई होत असतांना तहसीलदार उषाराणी देवगुणे, पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी भेट दिली. हा मॉल सील करण्यात आला असून प्रति व्यक्ती ५०० रुपायांप्रमाणे दंड वसूल करण्यात येत आहे.

( raver breaking rules closed shopping malls police action crowds customers )