esakal | रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; भाजीपाल्यासह केळीचे पीक आडवे

बोलून बातमी शोधा

rain
रावेर तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट; भाजीपाल्यासह केळीचे पीक आडवे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रावेर : तालुक्यातील उत्तरेकडील सातपुडा पर्वत भागात बुधवारी (ता. २१) दुपारी साडेचारच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्यामुळे केळीसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले.

हेही वाचा: ब्लॅकने ‘रेमडेसिव्हिर’ इंजेक्शन विकणाऱ्या पॅथाॅलाॅजीचा काळाबाजार उघड

तालुक्यातील सहस्त्रलिंग, जुनोने, गारबर्डी, अभोडा, मंगरूळ, पिंप्री, मोहगण, लालमाती या सातपुडा पर्वत भागात बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्याचा तडाखा व पावसासह हरभऱ्याएवढी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या भाजीपाला व केळी पीक आडवे पडून जमीनदोस्त झाले. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मंगरूळ शिवारातील लिलाबाई पाटील यांच्या चार एकर शेतातील गवार व काकडी पीक जमीनदोस्त होऊन या भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे, तर अभोडा शिवारात गणेश महाजन यांची ऐन तोडणीला आलेली पाच हजार डाळिंबाच्या झाडांचे वादळी वारा व गारांनी नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची पाहणीसाठी शेतकरी सायंकाळी शेतात गेले होते. नुकसानीचे पंचनामे व्हावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे