5 लाखांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्या चौघांविरुद्ध गुन्हा

नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ झाला.
woman harrasment
woman harrasmentesakal

जळगाव : नवीन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणावेत, यासाठी सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या विवाहितेचा छळ झाला. याप्रकरणी गुरुवारी (ता. ९) पतीसह सासरच्या मंडळींविरोधात एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सिंधी कॉलनीतील माहेर असलेल्या रिया शंकरलाल राजपाल (वय २०) यांचा विवाह गल्लीतील राहुल अशोककुमार तलरेजा यांच्याशी झाला. काही दिवसांनंतर पती राहुल याने विवाहितेला माहेरहून ५ लाख रुपये आणावेत, यासाठी तगादा लावला. माहेरची स्थिती हालाखीची असल्याने मागणी पूर्ण करू शकत नव्हती, म्हणून पती, सासू, दोन नणंद यांनी पैशांसाठी रियाचा छळ केला. छळाला कंटाळून रिया माहेरी निघून गेल्या.

woman harrasment
Jalgaon : पाटील कन्स्ट्रक्शनची 45 लाखांत फसवणूक

चौघांविरुद्ध गुन्हा

गुरुवारी त्यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पती राहुल तलरेजा, सासू आशा (दोन्ही रा. सिंधी कॉलनी), नणंद पूजा हरीश ननकानी (रा. पुणे) आणि नणंद वैशाली प्रदीप चावला (रा. चाळीसगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार प्रदीप पाटील तपास करीत आहे.

woman harrasment
Nashik : पहिल्याच पावसात 93 घरांची पडझड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com