जळगाव बाजार समितीच्या बारा संचालकांनी दिले सामूहिक राजीनामे

जळगाव बाजार समितीच्या बारा संचालकांनी दिले सामूहिक राजीनामे

जळगाव ः  चेअरमन यांच्या मनमानी कारभार पद्धतीला कंटाळून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बारा संचालकांनी सामूहिक जिल्हा उपनिबंधक सहकार यांच्याकडे सुपूर्द केले आहेत.

जिल्हा उपनिबंधक याना दिलेल्या सामूहिक राजीनामा पत्रात संचालकांनी म्हटले आहे की, सभापती कैलास छगन चौधरी यांना हे कोणालाही  विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कारभार करीत असतात. त्यामुळे आम्ही सामूहिक राजीनामे देत आहोत. पंकज साहेबराव पाटील, प्रभाकर गोबजी पवार,सुनील सुपडू महाजन,अनिल बारसू भोळे, लक्ष्मण गंगाराम पाटील, सुरेश श्यामराव पाटील, प्रशांत अरविंद पाटील, विमलबाई वामनराव भंगाळे, यमुनाबाई इंद्राराज सपकाळे, सरलाबाई  मच्छिंद्र पाटील, सिंधुबाई  मुरलीधर पाटील या संचालकांनी राजीनामे दिले आहेत.

बाजार समितीच्या आवारात सुरू असलेल्या संकुल बांधकामास  सदस्यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, बाजार समितीच्या  दोन्ही कडील प्रवेशद्वारा जवळ व्यापारी संकुलाचे बी. ओ. टी. तत्वावर बांधकाम करण्यात येत आहे. पराग कंट्रक्शन या कंत्राटदारास हे काम देण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, पणन मंत्री, पणन संचालक, तसेच औरंगाबाद उच्च न्यायालयात सादर केलेल्या कागद पत्रांच्या मंजुरी व्यतिरिक्त अधिक जागेवर बांधकाम करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्याचे या संचालकांनी म्हटले आहे. हे  बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे असे पत्र चेअरमन यांना देण्यात आले होते.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com