रेमडीसिव्हरचे वितरण होणार प्रशासनाच्या नियंत्रणात !

रेमडीसिव्हरचे वितरण होणार प्रशासनाच्या नियंत्रणात !

जळगाव ः कोविड-१९ आजाराच्या रुग्णांच्या उपचारासाठी अत्यावश्यक असणारे रेमडीसिव्हर औषधीचे वितरण जळगाव जिल्ह्यात प्रशासकीय नियंत्रणाखाली करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांनी आज दिली. 

अन्न व औषध प्रशासन विभागाकडून प्राप्त निर्देशांनुसार प्रथम प्राधान्याने शासकीय कोविड रुग्णालये, जिल्हा शल्य चिकीत्सकांकडून कोविड १९ उपचारासाठी मान्यता दिलेली खाजगी रुग्णालय (ज्यात रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत) यांना वितरण करण्याची व्यवस्था करणेत आलेली आहे. 
सार्वजनिक आरोग्य विभागाकडील ३१ ऑगस्ट, २०२० च्या अधिसूचनेत नमूद केलेप्रमाणे रेमडीसिव्हर व कोविड संबंधित औषधांचे दर रुग्णांकडुन आकारतांना संबंधित सर्व रुग्णालये/विक्रेते यांनी विक्री करतांना अधिकतम किंमत (एमआरपी) न आकारता, खरेदीची किंमत अधिक १०% अधिक कर इतकी किंमत आकारुन त्याची विक्री करण्याचे आदेशित करण्यात आला आहे. 

प्रिस्क्रीप्शनशिवाय औषध, इंजेक्शन देवू नका

किरकोळ औषधी विक्रेते यांनी उपलब्ध औषधींची साठेबाजी न करता अधिसूचनेत नमुद दरांनुसार आवश्यकतेप्रमाणे विक्री करावी. शासनमान्य नोंदणीकृत वैद्यकिय परवानाधारक डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय खाजगी व्यक्‍तींना रेमडीसिव्हर व कोविडची औषधे उपलब्ध करुन देण्यात येवु नये. असे आदेश निर्गमित करणेत आले आहेत. 
 

दोन दिवसात ३ हजार रेमडीसिव्हर येणार 
सद्यस्थितीत जिल्ह्यातील शासकीय रुग्णालये, इतर कोविड रुग्णालये, किरकोळ औषधी विक्रेते यांचेकडील 
उपलब्ध औषधी साठा वगळून आज सकाळी अकराला. २६८४ इतका रेमडीसिव्हरचा साठा आहे. येत्या एक दोन दिवसात तीन हजारांपेक्षा अधिक औषधींचा साठा नव्याने वितरणासाठी होणार आहे.

ॲक्टीव्ह संख्येपेक्षा साठा पुरेसा
उपलब्ध औषधी साठा हा जिल्ह्यातील ॲक्टीव्ह व औषधी आवश्यक असणाऱ्या कोविड रुग्णसंख्येच्या तुलनेत पुरेसा आहे. यामुळे कुठल्याही परिस्थितीत कोविड रुग्णालये, औषधी विक्रेते यांनी गोंधळाची स्थिती निर्माण करु नये, अश्या सूचना दिल्या जात आहेत. 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com