Jalgaon MIDC : नवीन एमआयडीसी जागेसाठी आज मंत्रालयात बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MIDC

Jalgaon MIDC : नवीन एमआयडीसी जागेसाठी आज मंत्रालयात बैठक

जळगाव : शहरात नवीन एमआयडीसी (MIDC) निर्माण करण्यासाठी गुरुवारी (ता. ९) मुंबईत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. (Meeting at Ministry today To create new MIDC jalgaon news)

जळगावात नवीन एमआयडीसी उभारून मोठे उद्योग शहरात आणावेत, तसेच कागारांसाठी ईएसआयसी रुग्णालय उभारण्यात यावेत, अशी मागणी आमदार सुरेश भोळे यांनी विधानसभेत केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिसाद दिला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

त्याबाबत निर्णय घेण्यासाठी गुरुवारी मंत्रालयात उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सायंकाळी सातला बैठक होणार आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आमदार सुरेश भोळे, औद्यौगिक विकास विभागाचे अधिकारी, जिल्हाधिकारी अमन मित्तल, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड उपस्थित राहतील, अशी माहिती आमदार भोळे यांनी दिली.