
MHT CET Exam : या तारखेपासुन एमएचटी-सीईटी परीक्षा; केंद्र परिसरात जमावबंदी
Jalgaon News : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे एमएचटी-सीईटी (MHT CET) प्रवेश परीक्षा ही ऑनलाईन पद्धतीने पीसीबी ग्रुप १६ ते २१ मे या कालावधीत होणार आहे. (MHT CET entrance exam will be conducted online for PCB Group from 16th to 21st May jalgaon news)
जळगाव जिल्ह्यातील एकूण ४ परीक्षा केंद्रांवर सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० प्रथम सत्र व दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ द्वितीय सत्र अशी दोन सत्रात परीक्षा घेण्यात येणार आहे.
त्यामुळे जिल्हादंडाधिकारी यांच्या निर्देशानुसार परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये व त्याठिकाणी कायदा- सुव्यवस्थेस बाधा निर्माण होऊ नये, यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) (२) जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पेपर सुरु झालेल्यापासून पेपर संपेपर्यंत जिल्ह्यातील सर्व परिक्षा केंद्रांच्या २०० मीटर परिसरात कोणीही प्रवेश करू नये, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी रविंद्र भारदे यांनी काढले आहेत.