Jalgaon Crime News : 47 हजारांच्या गुटख्यासह एकाला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Jalgaon Crime News : 47 हजारांच्या गुटख्यासह एकाला अटक

जळगाव : रायपूर (ता. जळगाव) येथे अवैध गुटखा विक्री करणाऱ्या तरुणाला एमआयडीसी (MIDC) पोलिसांनी ताब्यात घेतले. (MIDC police arrested young man who was selling illegal gutka jalgaon crime news)

त्याच्याकडून ४७ हजार ७१८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. रायपूर (ता. जळगाव) येथील संदीप सीताराम परदेशी (वय ३६) प्रतिबंधीत गुटखा विक्री करत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली.

त्यावरून पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील, गणेश शिरसाळे, विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, किरण पाटील, राकेश बच्छाव, राहुल रगडे, विशाल कोळी, महिला पोलिस नाईक भारती देशमुख आणि अन्न सुरक्षा अधिकारी सुवर्णा महाजन यांनी सकाळी अकराला रायपूर येथे छापा टाकून संदीप परदेशी याला ताब्यात घेतले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

त्याच्याकडून ४७ हजार ७१८ रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक आनंदसिंग पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Jalgaoncrime