Satyajeet Tambe : "शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध" आमदार सत्यजित तांबेंची ग्वाही | MLA Satyajit Tambe statement about Determined to solve problems in education sector jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials of the teachers' unions while discussing various issues with MLA Satyajeet Tambe who is on a visit to the district.

Satyajeet Tambe : "शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध" आमदार सत्यजित तांबेंची ग्वाही

Jalgaon News : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे शुक्रवारी (ता. २६) भडगाव, जामनेर तालुक्यांतील विविध शिक्षक संघटना, शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून समस्या, प्रश्‍न जाणून घेतले.

शैक्षणिक क्षेत्रातील प्रश्‍न सोडविण्यासंदर्भात कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिली. (MLA Satyajit Tambe statement about Determined to solve problems in education sector jalgaon news)

डॉ. सुधीर तांबे यांच्यावर आपण मागील १५ वर्षे विश्वास दाखवला. त्यांच्याप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीत जळगावकरांनी मला भरभरून प्रेम दिले. यामुळे जळगावकरांचे आमच्यावर व आमचे जळगावकरांवर विशेष प्रेम आहे, अशा शब्दात आमदार सत्यजित तांबे यांनी आपल्या मतदारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

पदवीधर मतदारसंघातून निवडून आल्यानंतर सत्यजित तांबे यांनी दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी भडगाव व जामनेर शासकीय विश्रामगृहात डॉक्टर्स असोसिएशन, शैक्षणिक व पदवीधर संघटनांच्या पदाधिकारी, तसेच कार्यकर्त्यांची भेट घेतली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यांचे प्रश्न आणि समस्या जाणून घेतल्या. या वेळी बोलताना, आपण मांडलेल्या सर्व समस्या आणि प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू असून, यासंदर्भात शासन स्तरावर योग्य तो पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार तांबे यांनी सांगितले.

आमदार झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विविध मुद्दे उपस्थित करून छाप पाडणाऱ्या आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रयत्नांतून जळगाव शहरात युवा माहिती केंद्रांची स्थापना होणार आहे. त्यासाठी श्री. तांबे यांनी एक कोटी व अमळनेर येथील सुप्रसिद्ध मंगळग्रह मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यासाठी २० लक्ष निधी शासनाकडून मंजूर करून घेतला आहे.

शुक्रवारच्या दौऱ्यात त्यांनी अमळनेर येथील विख्यात श्री मंगळग्रह मंदिरालाही भेट दिली. मंदिर विश्‍वस्तांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील तब्बल ५५ शाळांना प्रत्येकी एक संगणकाचे वाटप श्री. तांबे यांनी आपल्या आमदार निधीतून केले आहे.

टॅग्स :JalgaonSatyajeet Tambe