
Satyajeet Tambe | व्यक्तिगत संबंधांचा विकासासाठी वापर करणार : आमदार सत्यजित तांबे
अमळनेर (जि. जळगाव) : नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे हे अमळनेर दौऱ्यावर आले असताना त्यांचा अमळनेर तालुक्यातर्फे मराठा मंगल कार्यालयात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
आमदार अनिल पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार स्मिता वाघ, मराठा समाजाचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉ. अनिल शिंदे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. (MLA Satyajit Tambe statement regarding use personal relationships for development jalgaon news)
सत्यजित तांबे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले, की मी अपक्ष म्हणून निवडून आल्याने माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत, सभागृहात देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावर ते म्हणाले की २००४ पासून फडणवीस आणि माझे वैयक्तिक संबंध आहेतच.
आणि त्या वैयक्तिक संबंधांचा विकासासाठी वापर करेल. मी निवडणुकीत काय वाटले, असे विचारले जाते. मात्र मी लोकांना प्रेम वाटले आणि माझ्या वडिलांनी केलेल्या कामांच्या जोरावर मी निवडून आलो आहे. तांबे परिवाराने कधीही कोणाशीच भेदभाव अथवा द्वेष केलेला नाही. निम्न तापी प्रकल्प पाडळसरेची माहिती मला नाही, ती मिळाल्यावर निश्चित प्रयत्न करेल.
या वेळी आमदार अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, जयवंतराव पाटील, प्राध्यापक संघटनेचे अध्यक्ष संजय सोनवणे, शिक्षक भारतीचे आर. जे. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संदीप घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
हेही वाचा : बँक खात्याला जोडलेल्या सिमकार्डबाबत बाळगा ही काळजी...
या वेळी तालुकास्तरीय नागरी समितीच्यावतीने सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. जळगाव जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढीचे संचालक तुषार बोरसे यांचाही सत्कार करण्यात आला.
या वेळी मराठा समाज, खान्देश शिक्षण मंडळ, मराठा संघाचे सचिव विक्रांत पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शहराध्यक्ष मनोज पाटील, के. डी. पाटील, भाजप तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, शिवसेना शिंदे गट, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील , श्याम पाटील, बन्सीलाल भागवत, विनोद कदम, पराग पाटील, माजी सभापती प्रफुल पाटील,
मुन्ना शर्मा, मौर्य क्रांती संघ,संभाजी ब्रिगेड, राजमुद्रा फाऊंडेशन, पाडळसरे जनआंदोलन समिती, ग्रामसेवक संघटनेचे दिनेश साळुंखे, तालुका क्रीडा संघटना, नगरपालिका कर्मचारी, सानेगुरुजी पतपेढी, माध्यमिक शिक्षक संघटना पदाधिकारी, प्राथमिक शिक्षक संघ, मंगळ ग्रह सेवा संस्था जेष्ठ नागरिक मंडळ, शैक्षणिक संस्था, कपिलेश्वर मंदिर, मुन्ना शर्मा अशा विविध संघटनांतर्फे सत्यजित तांबे यांचा सत्कार करण्यात आला.