महावितरणकडून मॉन्‍सूनपूर्व कामांना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरणकडून मॉन्‍सूनपूर्व कामांना वेग

महावितरणकडून मॉन्‍सूनपूर्व कामांना वेग

जळगाव : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महावितरणकडून मॉन्सूनपूर्व कामांना गती देण्यात येत आहे. वाऱ्यामुळे झाड किंवा झाडांच्या फांद्या तुटून वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असतात. याची खबरदारी म्हणून महावितरणतर्फे मॉन्सून पूर्व कामे हाती घेण्यात आली आहेत. यात वीज तारांना अडथळा ठरणाऱ्या फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे.

प्रामुख्‍याने पावसाळ्यात वादळ, वारा व पावसामुळे वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रकार होत असतात. हे प्रकार टाळण्यासाठी महावितरणतर्फे पावसाळी पूर्व वीज वितरणच्या देखभाल व दुरुस्तीचे कामेही युद्ध पातळीवर सुरू आहेत. जळगाव शहरासह जिल्हाभरातील ग्रामीण भागामध्येही वीज प्रवाहाला अडथळा ठरत असलेल्या वृक्षांच्या फांद्या तोडण्यात येत आहेत. जळगाव जिल्ह्यात सर्वेक्षण करून अडथळा ठरणाऱ्या फांद्या छाटल्‍या जात आहेत.

हेही वाचा: जळगाव : विजेचा धक्का लागून बांधकाम मजुराचा मृत्यू

ट्रान्‍सफॉर्मर मेंटेनन्सचही काम

लघू आणि उच्च दाबाच्या वीज वाहिन्या सरळ करणे, त्या दुरुस्ती करणे, तसेच यावेळी ट्रान्सफॉर्मरमधील ऑइल लेव्हल तपासणे, कमी असेल तर लेव्हल पूर्ण करणे, तसेच खांबावरचे तुटलेले डिस्क आणि पीन इन्सुलेटरही बदलण्यात येत आहेत. अनेक वेळा विजेच्या प्रवाहामुळे हे इन्सुलेटर तापतात. या इन्सुलेटरवर पाण्याचे थेंब पडल्यास ते तडकून वीज प्रवाह खंडित होतो. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून महावितरणतर्फे तडा गेलेली इन्सुलेटर बदलविण्यात येत आहेत.

हेही वाचा: नुकसानीचे पंचनामे त्वरित पूर्ण करा : खासदार रक्षा खडसे

Web Title: Msedcl Speeds Up Pre Monsoon Work In Jalgaon News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonMonsoonMSEDCL
go to top