जळगावकरांना दिलासा; महापालिकेचे अकराशे कोटींचे अंदाजपत्रक सादर 

जळगावकरांना दिलासा; महापालिकेचे अकराशे कोटींचे अंदाजपत्रक सादर 

जळगाव ः गेल्या वर्षभरापासून कोविडमुळे जळगावकरांची आर्थिक घडी विस्कटली असून, त्यांच्यावर महापालिकेने कोणताही कराचा बोझा न लावता २०२१-२०२२ चे सुधारित शिलकीचे एक हजार १६९ कोटी ७० लाखांचे अंदाजपत्रक गुरुवारी  स्थायी समितीपुढे मांडण्यात आले. प्रशासनातर्फे मांडलेल्या अंदाजपत्रकावर अभ्यास करून निर्णय घेण्यासाठी सभा तहकूब करण्यात आली. 


या वेळी आयुक्तांनी २०२०-२०२१ चे सुधारित अंदाजपत्रक, तर २०२१-२२ या वर्षाचे मूळ शिलकीचे अंदाजपत्रक स्थायी समितीपुढे सादर केले. २०२१-२०२२ या वर्षी पहिल्या टप्प्यात भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण होणे अपेक्षित असून, मलप्रक्रिया कार्यान्वित केली जाणार आहे. ही योजना कार्यान्वितनंतर तिची देखभाल व दुरुस्ती खर्च अधिनियमाच्या तरतुदीनुसार मलप्रवाह कर नव्याने करावा लागणार आहे. त्यात सांडपाणी, शौचालय कनेक्शन जोडणी देताना जोडणी शुल्क आकारणी करावी लागेल. त्यासाठी कर व जोडणी आकारणीचा प्रस्ताव योग्य वेळी महासभेपुढे सादर करण्याचा प्रस्तावित केला आहे. 

सेवाशुल्क आकारणीत वाढ 
महापालिकेमार्फत प्रभागस्तरावरून वेगवेगळे दाखले, उतारे, मिळकत हस्तांतर आदी सेवा दिल्या जातात. यासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवाशुल्कामध्ये वाढ सुचविलेली आहे. २०२०-२१ या वर्षात ५० कोटी इतके सुधारित उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले होते. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी थकीत कराची वसुली आकारण्यासाठी सक्तीचे वसुली करावी लागणार आहे. त्यासाठी तशा सूचना देण्यात आल्या असून, २०२१-२०२२ या आर्थिक वर्षात ७५ कोटी ३० लाख रुपये मालमत्ता कराचे उत्पन्न अपेक्षित अंदाजपत्रात धरण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com