
Jalgaon News : जनतेच्या तक्रारींचा निपटारा करा, अन्यथा कारवाई; आयुक्तांची अधिकाऱ्यांना तंबी
जळगाव : नागरी सुविधेबाबत शहरातील नागरिक, सामाजिक संघटना निवेदने घेऊन येत असतात. आपण ती संबंधित विभागाकडे (Department) पाठवितो. (Municipal Commissioner message to officials that Redress grievances of public otherwise action will be taken jalgaon news)
त्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सात दिवसांत त्याचा निपटारा करून अहवाल द्यावा, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त विद्या गायकवाड यांनी एका आदेशाद्वारे अधिकाऱ्यांना दिला आहे.
शहारातील विविध समस्या सोडविण्याबाबत नागरिक, समाजिक संघटना, लोकसेवक आदी निवेदने घेऊन आयुक्तांकडे येतात. मात्र, निवेदनांबाबत महापालिकेचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी दिलेले निवेदने संबंधित विभागाकडे पाठविले जाते.
मात्र, त्या विभागाचे अधिकारी त्या निवेदनातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करतात, तसेच त्या निवेदनाचे पुढे काय होते, त्याचा अहवालही अधिकारी देत नसल्याचे दिसून आले आहे. याबाबत अनेक नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. त्यांनी त्याची दखल घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांना थेट आदेशच काढले आहेत.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
याबाबत काढलेल्या आदेशात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी म्हटले आहे, की शहरातील समस्यांबाबत नागरिकांची आयुक्ताकडे प्रत्यक्ष तक्रार अर्ज किंवा निवेदने येत असतात, अशा तक्रार अर्ज व निवेदनावर आयुक्त कार्यालयाकडून लाल पेनने इंग्रजी अक्षरात ‘झेड’ प्रकरण म्हणून नोंद करण्यात येते व ते संबंधित विभागाकडे पाठविण्यात येतील.
ही प्रकरणे विभागाकडे आल्यानंतर सात दिवसांच्या आत त्याचा निपटारा करावयचा आहे. मात्र, सात दिवसांत त्याचा निपटारा न झाल्यास संबंधित विभागप्रमुखावर जबाबदारी निश्चित करून कडक कारवाई करण्यात येईल. प्रत्येक अधिकऱ्यांनी याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी, दर आवड्याला सोमवारी आयुक्त कार्यालयात या अर्जांचा आढावा घेण्यात येईल.