‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा नगरपालिकेचा कारभार !  

विनोद सुरवाडे | Wednesday, 23 December 2020

वरणगाव (ता. भुसावळ) : तत्कालीन ग्रामपंचायतीपासून शहरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालल्याने विद्यमान वरणगाव नगर परिषदेने कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मितीचे नियोजन केले होते. कोट्यवधी रुपयांना खत विकले जाईल, शहराच्या विकासाला हातभार लागेल, या अनुषंगाने पालिका प्रशासनाने दूरदर्शी नियोजन केले होते. त्यासाठी ३४ लाख रुपये खर्च करावे लागले आणि खत दहा हजार ४०० रुपयांना विकल गेले. ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असा प्रत्यय मात्र शहरातील नागरिकांना अनुभवास आला. 

आवश्य वाचा- जळगाव जिल्ह्यातील ७६ टक्के शेतकऱ्यांचा मका खरेदी अजून बाकी 

शहरातील कचऱ्याचा प्रश्न सुरवातीपासून गंभीर आहे. त्या अनुषंगाने नगर परिषदेने विविध उपाययोजना केल्या. मात्र प्रश्न सुटेना, शासन योजनांच्या दृष्टिकोनातून पालिकेने कचऱ्यापासून शेतीपयोगी खतनिर्मितीचे नियोजन केले. त्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये नाशिक येथील ईबीएन व्हायरो बायोटेक प्रा. लिमिटेड कंपनीला ३४ लाख रुपयांना मक्ता देण्यात आला होता. ओला कचरा व सुका कचरा, दगड, माती, काच प्लॅस्टिक असे कचऱ्यातील विविध घटक वेगवेगळे करून त्यापासून खतनिर्मितीचे कंपनीचे नियोजन होते. या कंपनीला सहा महिन्यांचा कार्यादेश देण्यात आला होता. मात्र, कंपनीने पूर्ण एक वर्ष वेळ घेतला. नगर परिषदेने प्रक्रिया केलेले खत कंपनीकडून आपल्या ताब्यात घेऊन कंपनीला ३४ लाख रुपयांचा धनादेश अदा केला होता. शहरातील कचरा गोळा करण्यासाठी वर्षभराचा कर्मचारी पगार, वाहनांचा इंधन खर्च, वाहनांची दुरुस्ती, स्टेशनरी असा वेगळा खर्च नगर परिषदेच्या डोक्यावर असताना कालांतराने खत विक्रीसाठी वर्तमानपत्रात निविदा खर्च पाच हजार रुपये असा एकूण खर्च करून प्रक्रिया केलेल्या खताचा लिलाव करण्यात आला. 

Advertising
Advertising

आवश्य वाचा- जळगावकर सावधान ः थंडीचा जोर वाढताच चोरटे सक्रिय, तीन ठिकाणी घरफोड्या 

नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी 
शासन बोली दहा हजार ठेवण्यात आली असताना लिलाव प्रक्रिया दहा हजार ४०० रुपयांत पार पडली. मात्र नगर परिषदेला ३४ लाखांच्या वर खतनिर्मितीला आलेला खर्च आणि लिलाव मात्र १० हजार ४०० रुपये, तर ‘आमदनी अठ्ठन्नी, खर्चा रुपय्या’ असे वरणगावकरांना अनुभवयास मिळाले. असे असले तरी पालिकेचा अधिकारी वर्ग बेजबादारपणा दर्शवून शहरातील नागरिकांच्या पैशांची उधळपट्टी करताना दिसत आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे