Jalgaon News : चक्क ! नाला नकाशावरून गायब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon News : चक्क ! नाला नकाशावरून गायब

जळगाव : शहरातील पिंप्राळा भागातील आशाबाबानगर परिसरातून वाहणारा नाला चक्क नकाशावरून गायब झाला आहे. भराव करून नाला वळवून बांधकाम केल्यामुळे हा प्रकार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दहा जणांना नगररचना विभागाने नोटीस दिल्या आहेत.

नाला वळवून बांधकाम करण्याचे धक्कादायक प्रकार शहरात सुरू आहेत. त्यातीलच प्रकार पिंप्राळा परिसरातील आशाबाबानगरात उघडकीस आला आहे. (Nala in Aashababanager Has disappeared from map Type of canal diversion by filling Notice to ten persons Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

रामानंद परिसरातील उतारावरून वाहणारा नाला प्रिंप्राळा व आशाबाबानगर परिसरतून वाहतो. मात्र, या भागात रहिवासी भाग वाढत गेला. ज्यांनी नालाकाठी जागा घेतल्या, त्यांनी आपल्या आवश्‍यकतेप्रमाणे जागा वाढवून नाल्याचे पाणी वळविले.

आपल्या प्लॉटचे बांधकाम झाल्यानंतर त्यात भराव टाकून तो थेट दुसऱ्याच्या प्लॉटमध्ये पाणी सोडून दिले जाते. ज्यावेळी तो प्लाटधारक बांधकाम सुरू करीत असे.

त्यावेळी त्याला प्रकार लक्षात येत असे, तोही मग त्यात भराव टाकून त्या नाल्याचे पाणी पुढच्या प्लॉटमध्ये वळती करीत असे, हा प्रकार गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हा नाला पुढे जाऊन काही ठिकाणी चक्क ‘नाली’ झाला आहे. त्यामुळे पाणी वाहण्यासही आता अडचणी निर्माण होत आहे.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार

तक्रार आता नागरिकांचीच

‘नाला’ कमी होऊन त्याची ‘नाली’ झाली. त्यामुळे प्रशासन जागे होऊन कारवाई करीत असेल, असे म्हणणे असेल तर ते चुकीचे ठरणार आहे. कारण याप्रकारणी प्रशासन नव्हे, तर आता चक्क नागरिकांचीच तक्रार आहे. आता ज्याच्या प्लॉटमध्ये पाणी येत आहे. ते महापालिकेत तक्रार करीत आहेत आणि या पाण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करीत आहेत.

अनेक गुंतागुंती

नागरिकांच्या तक्रारीवरून नगररचना अधिकारी पाहणी करीत आहेत. मात्र, कागदावर ज्या भागात प्लॉट आहे, त्या ठिकाणी नालाच नसल्याचे दिसत आहे. तो नाला कागदावर दुसऱ्या प्लॅाटमध्ये वळविलेला असल्याचे दिसत आहे. प्लॉटधारकनेही भराव टाकून बांधकाम केल्याचे दिसत अहे. त्यामुळे तो तिसऱ्याच ठिकाणी नाला असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक गुंतागुंत निर्माण झाल्या आहेत.

कागदपत्रे तपासणीनंतर पुढील कारवाई

नागरिकांच्या तक्रारी आल्यावरून महापालिकेच्या नगररचना विभागाने आता नालाकाठावरील दहा जणांना नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की नाला सरळीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील. आता हा नाला ज्या ठिकाणाहून वाहत आहे, त्या ठिकणावरून तो जवळच्या नालाला जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्यांनी नाल्याकाठी बांधकाम केले आहे, त्यांना येत्या १५ दिवसांत आपल्या कागदपत्रासह नगररचना विभागात हजर राहण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. कागदपत्रांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

हेही वाचा: Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

टॅग्स :JalgaonmapDrainage Line