Jalgaon News: राष्ट्रवादीतर्फे खोक्यांची होळी करून महागाईचा निषेध; कापूस, कांद्याला भाव देण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon NCP

Jalgaon News: राष्ट्रवादीतर्फे खोक्यांची होळी करून महागाईचा निषेध; कापूस, कांद्याला भाव देण्याची मागणी

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर व राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव महानगरतर्फे गॅस सिलिंडर दरवाढीच्या निषेधार्थ महागाईची होळी करण्यात आली, तसेच शेतकऱ्यांच्या कांदा व कापसाला भाव देण्याची मागणीही करण्यात आली.

आकाशवाणी चौकातील जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाजवळ ५० खोक्यांची होळी करण्यात आली. गॅस सिलिंडर दरवाढ, कापूस व कांद्याला भाव वाढून मिळण्यासाठी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. घोषणांमुळे परिसर दुमदुमला होता.

जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील यांच्या हस्ते ५० खोक्यांच्या होळीचे दहन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक शहर जिल्हाध्यक्ष रिंकू चौधरी, इब्राहिम तडवी, राजू मोरे, किरण राजपूत, रमेश बाऱ्हे, साहिल पटेल, रफिक पटेल, ललित नारखेडे, चेतन पवार, कुंदन सूर्यवंशी, सचिन साळुंखे, सिद्धार्थ गव्हाणे, हितेश जावळे, अशोक सोनवणे, राहुल टोके, विशाल देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.

टॅग्स :HoliJalgaonNCPinflation