NEET Exam : ‘नीट’ची परीक्षा अन्‌ पालकांची तारांबळ! उन्हात परीक्षा संपेपर्यंत बस्तान

Crowd of students and parents outside L. H.Patil English Medium School on Sunday.
Crowd of students and parents outside L. H.Patil English Medium School on Sunday.esakal

NEET Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा शहरासह जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर रविवारी (ता. ७) घेण्यात आली.

परीक्षेसाठी शहरातील परीक्षार्थींना जिल्ह्यातील इतर (ग्रामीण भागातील) केंद्रांवर, तर ग्रामीण भागातील परीक्षार्थींना जळगाव शहरातील केंद्र देण्यात आली होती.

यामुळे शहरातील परीक्षा केंद्रावर ग्रामीण भागातील परीक्षार्थी व पालक दिसून आले. केंद्रात पाल्यांना सोडल्यानंतर पालकांनी भर उन्हात मिळेल त्या ठिकाणी बस्तान मांडल्याचे चित्र होते. (NEET exam and parents excitement summer jalgaon news)

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Crowd of students and parents outside L. H.Patil English Medium School on Sunday.
Friendship : मैत्रीखातर स्वित्झर्लंड येथील उद्योजक मार्कस व्हेस्टनर खामखेड्यात घेणार विवाहसोहळ्याचा आनंद!

सकाळी साडेअकरापर्यंत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याने परीक्षार्थी व पालकांनी सकाळी दहापासून परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केली होती. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी करणयात आली.

त्यांच्याकडे कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य तर नाही ना, असेल तर ते काढून घेऊनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. ही तपासणी सुमारे दुपारी दीडपर्यंत सुरू होती. जिल्ह्यात या परीक्षेस सहा हजार चार विद्यार्थी बसले होते.

अनेक पालकांनी आपापली वाहने आणली होती. परीक्षा संपेपर्यंत काही पालकांनी वाहनात किंवा परीक्षा केंद्राजवळील झाडाच्या सावलीत गप्पा करीत, भोजन करीत वेळ घालविला. रविवारी उन्हाचा पारा ३९ अंशावर असल्याने कडक ऊन पडले होते. उन्हाच्या झळाही अधिक होत्या. यामुळे पालक सावलीच्या शोधात होते.

Crowd of students and parents outside L. H.Patil English Medium School on Sunday.
NEET Exam: वैद्यकीय प्रवेशाच्‍या ‘नीट’ ला 95 टक्‍के उपस्‍थिती; प्रश्‍नांनी घेतली विद्यार्थ्यांची परीक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com