NEET Exam : जिल्ह्यात 13 केंद्रांवर आज ‘नीट’ परिक्षा | NEET exam today at 13 centers in district jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

neet

NEET Exam : जिल्ह्यात 13 केंद्रांवर आज ‘नीट’ परिक्षा

Jalgaon News : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली नॅशनल एलिजिबिलिटी एन्ट्रन्स टेस्ट (नीट) ही प्रवेश परीक्षा रविवारी (ता. ७) होणार आहे. (NEET exam today at 13 centers in district jalgaon news)

जळगाव जिल्ह्यातील १३ परीक्षा केंद्रांवर ६ हजार ४ विद्यार्थी प्रविष्ठ होणार आहेत.
दरम्यान, या परिक्षेसाठी जळगाव शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा ग्रामीण भागातील केंद्रांवर, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची परीक्षा शहरातील परीक्षा केंद्रावर होणार आहे.

यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांना जाण्या-येण्याचा प्रवास खर्च वाढलेला आहे. देशभरातील विविध शहरांतील परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा होत आहे. परीक्षेसाठी महाराष्ट्रात सात लाख विद्यार्थी प्रविष्ठ होणार असल्याने परीक्षेच्या पार्श्‍वभूमीवर विशेष खबरदारी घेतली जाणार आहेत.

परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी मेटल डिटेक्टरद्वारे विद्यार्थ्यांची तपासणी झाल्यानंतर प्रवेश दिला जाईल. तसेच, विद्यार्थ्यांना कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेऊन जाण्यास बंदी असेल. सकाळी ११.३०पर्यंत विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

वैद्यकीय अभ्यासक्रमातील एमबीबीएस, बीडीएस, बीएएमएस, बीएसएमएस, बीयूएमएस आणि बीएचएमएस या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संयुक्तरित्या नीट परीक्षा घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे अखिल भारतीय स्तरावरील महत्वांच्या परीक्षांचे आयोजन केले जाते. परीक्षेसाठी हॉल तिकीट एनटीएच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

१८० प्रश्‍नांसाठी ७२० गुण

वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांतील प्रथम वर्ष प्रवेशासाठी नीट परीक्षा अनिवार्य आहे. नीट परीक्षा लेखी स्वरूपात घेतली जाते. दुपारी २ ते ५.२० या वेळेत नीट परीक्षा होईल. या परीक्षेत बायोलॉजी, फिजिक्स, केमिस्ट्री या तीन विषयांवर एकूण १८० प्रश्‍न विचारले जातील. एकूण ७२० गुणांसाठी ही परीक्षा होईल, अशी माहिती जळगाव जिल्ह्यातील या परिक्षेच्या आयोजकांनी दिली.

टॅग्स :JalgaonNEET Exams