Jalgaon News : उद्योग, व्यवसायात नवीन विचारांना चालना हवी; तज्ज्ञांचा सूर

Jalgaon News
Jalgaon Newsesakal

जळगाव : व्यवसाय, उद्योग क्षेत्रात यश मिळवायचे असेल, तर तरुणांनी विचारांना चालना, स्वयंशिस्त व भविष्यातील बदलांचा वेध घेऊन प्रवास करावा, असे आवाहन तज्ज्ञांनी केले.

केसीई आयएमआरमध्ये ‘व्यवसायातील नवकल्पना, स्वयंचलन आणि भविष्याचा मागोवा’ या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध विषयांतील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Jalgaon News
Engineering Jobs : १ लाख पगार मिळवण्याची अभियंत्यांना संधी; या विभागात भरती सुरू

या परिषदेचे उद्‌घाटन उमविचे प्र-कुलगुरू प्रा. डॉ. एस. टी. इंगळे यांच्या हस्ते झाले. उमाकांत नारखेडे, इंन्फोसिसचे (युएस) यांचे बीजभाषण झाले. प्रसिद्ध उद्योजक वैभव नेहेते आणि ‘उमवि’च्या केसीआयआयएलचे व्यवस्थापक सागर पाटील प्रमुख पाहुणे होते. डॉ. श्वेता चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.

सुरवातीला परिषदेचे निमंत्रक डॉ. पराग नारखेडे यांनी या परिषदेची संकल्पना उपस्थित संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांसमोर विषद केली. त्यानंतर संचालक प्रा. डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी ही कॉन्फरन्स हायब्रिड मोड असल्याने भारतातून आणि परदेशातूनही अनेक संशोधक यात सहभागी असल्याचे सांगत संवाद साधला.

Jalgaon News
Education News : येत्या शैक्षणिक वर्षापासून मुलांच्या दप्तराचे ओझे कमी होणार! पुस्तकांत दिसणार हे बदल

उद्‌घाटनपर भाषणात प्रा. इंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात, व्यवसायातील इनोव्हेशन, ऑटोमेशन आणि त्याच्याशी संबंधित भविष्यातील महत्त्वाचे घटकांवरील संशोधनावर या परिषदेतून विचारविनिमय होणार आहे.

भारतात संशोधन आणि त्यायोगे होणाऱ्या विकासाला खूप स्कोप आहे. अँटोमेशनवरही भारत फोकस करीत आहेत. स्टीम लाईममध्ये भविष्यातील शक्यतांचा विचार करत असताना डिजिटालाइजेशन आणि क्लाऊड बिझनेस यात भारतीय फार महत्त्वाची भूमिका घेत आहे. इथे अनुभवी लोक हवे आहेत. त्यामुळे विद्यार्थांनी अशा विषयांवरील संशोधनाला प्रधान्य दिले पाहिजे.

केसीईचे व्यवस्थापन सदस्य डॉ. हर्षवर्धन जावळे म्हणाले, की एक डॉक्टर म्हणून या क्षेत्रातही अनेक इनोव्हेशन होत आहेत. या बदलांमुळे आता कित्येक मोठ्या सर्जरीनंतरही रुग्ण त्याच दिवशी घरी जाऊ शकतो.

Jalgaon News
Jalgaon Municipal Corporation: जळगाव महापालिका संपूर्ण कर्जमुक्त; हुडकोच्या कर्जाचा भरला शेवटचा हप्ता

त्यानंतर उमाकांत नारखेडे यांनी मनोगतात आर्टिफिशियल इंटिलिजन्स हा भविष्यातील फार महत्त्वाचा रिसोर्स असल्याचे सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजेंस, डीप लर्निंग, मशीन लर्निंग, जे तुम्ही करत आहात ते तुम्हाला पूर्णतः समजत नसेल, तर ते नीट शिका, अन्यथा तुम्ही नुसतेच डायनासोर व्हाल, असे ते म्हणाले.

प्रमुख पाहुणे उद्योजक वैभव नेहेते, केसीआयआयएलचे सागर पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रियांका खरारे यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर दोन्ही विभागांतील ४० संशोधकांनी आपले संशोधन पेपर मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com