Jalgaon News : तारखेडा सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर | No confidence motion passed against Tarkheda Sarpanch jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

Jalgaon News : तारखेडा सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर

Jalgaon News : तारखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथील ग्रामपंचायतीचे सरपंच हे उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नसल्याचा ठपका ठेवत सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव करण्यात आला होता. दरम्यान, गुरुवारी (ता. १३) सरपंचांविरुद्ध ७- १ असा अविश्वासाचा ठरावास तहसीलदार प्रविण चव्हाणके यांनी मंजूर केला. (No confidence motion passed against Tarkheda Sarpanch jalgaon news)

तारखेडा खुर्द (ता. पाचोरा) येथे नऊ सदस्यांची ग्रामपंचायत असून, गेल्या दोन वर्षांपासून सरपंच स्वाती नवल गुजर या मनमानी कारभार करतात, ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्यांना विश्वासात घेत नाही, तसेच गावाच्या विकासाकडे दुर्लक्ष करतात, या कारणांमुळे उपसरपंच सुनील सोनवणे, सदस्या आशा मराठे, आशा गोसावी, संगीता पाटील, सदस्य देविदास पाटील, मधुकर पाटील, अनिल पाटील अशा उपसरपंचांसह ७ सदस्यांनी सरपंच स्वाती नवल गुजर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव केला होता.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

या प्रकरणी १३ एप्रिलला तहसीलदार प्रवीण चव्हाणके यांनी तारखेडा खुर्द ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन माहिती जाणून घेत सरपंच स्वाती नवल गुजर यांच्याविरुद्ध ७ - १ असा अविश्वास ठराव मंजूर केला आहे. याप्रसंगी ७ सदस्यांसह ग्रामसेवक समाधान पाटील हे उपस्थित होते. तर उर्वरित एक सदस्या कल्पना पाटील या प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर होत्या. या वेळी ग्रामपंचायत परिसरात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी नरेंद्र नरवाडे, प्रकाश पाटील, यशवंत पाटील हे देखील उपस्थित होते.

टॅग्स :JalgaonGram Panchayat