Chaitra Navratri 2023 : मंगळग्रह मंदिरात ‘नवचंडी महायाग’; चैत्र नवरात्रीनिमित्त आयोजन

on the occasion of Chaitra Navratri with host seated conjugally for Navachandi Mahayag puja.
on the occasion of Chaitra Navratri with host seated conjugally for Navachandi Mahayag puja.esakal

अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात चैत्र नवरात्रीनिमित्त दुर्गाष्टमीचे औचित्य साधून बुधवारी (ता. २९) नवचंडी महायाग झाला. सकाळी नऊ ते दुपारी बारा व दुपारी दोन ते सायंकाळी पाच या दोन सत्रांत भक्तिमय वातावरणात अनेक भाविकांच्या साक्षीने पार पडलेल्या या महायागाचे विविध क्षेत्रातील आठ यजमान होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार मुख्य यजमान होते. (occasion of Chaitra Navratri Navchandi Maha Yagya was performed on 29 march in Shree Mangal Graha temple jalgaon news)

राज्यात असलेल्या देवीच्या साडेतीन शक्तिपीठांची व विश्वातील एकमेव असलेल्या भूमीमातेच्या प्रतिमेची आरास भाविकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. या वेळी श्री गणपती पुण्यवाचन, मातृकापूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, सर्वतोभद्र मंडल पूजन, क्षेत्रपाल पूजन, चतुषश्ट भैरव पूजन, नवग्रह पूजन, ईशान्य रुद्रकलश पूजा, दुर्गा सप्तशती पाठांचे हवन, स्थापित देवतांचे हवन, बलिदान, पूर्णाहुती करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी सहाला महाआरती झाली.

पूजेसाठी निवृत्त प्राचार्य डॉ. एम. बी. चव्हाण, भाजपचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील, ज्ञानवर्धिनी क्लासेसचे संचालक शिरीष डहाळे, निवृत्त पर्यवेक्षक आर. पी. नवसारीकर, राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रवीण सपकाळे, विश्व हिंदू परिषदेचे तालुकाध्यक्ष संजय विसपुते यजमान होते. मंदिराचे पुजारी प्रसाद भंडारी, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, मंदार कुलकर्णी, अक्षय जोशी,नरेंद्र उपासनी, हेमंत गोसावी यांनी पौरोहित्य केले. वादक अंकुश जोशी व चंद्रकांत जोशी यांनी त्यांची साथसंगत केली.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

on the occasion of Chaitra Navratri with host seated conjugally for Navachandi Mahayag puja.
Ram Navami 2023 : कुंचल्यातून साकारला ‘सत्याचा विजय’

मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे यांच्यासह सेवेकरी विनोद कदम, व्ही. व्ही. कुलकर्णी, नीलेश महाजन, राहुल पाटील, उमाकांत हिरे व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव

श्री मंगळग्रह मंदिर येथे श्रीराम नवमीनिमित्त गुरुवारी (ता. ३०) दुपारी बाराला श्रीराम जन्मोत्सव विधिवतरीत्या साजरा होईल. सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी हे सपत्नीक या महापूजेचे मानकरी आहेत. भाविकांनी जन्मोत्सव तथा तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा, असे मंगळग्रह सेवा संस्थेने कळविले आहे.

on the occasion of Chaitra Navratri with host seated conjugally for Navachandi Mahayag puja.
Ram Navami 2023 : घरोघरी आज होणार श्रीराम जन्मोत्सव; शोभायात्रेचे आकर्षण!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com