Jalgaon News : जुन्या वादातून दोन कुटुंबांत घमासान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

dispute

Jalgaon News : जुन्या वादातून दोन कुटुंबांत घमासान

जळगाव : जुन्या वादातून तरुणासह घरातील चार जणांना शिवीगाळ करून मारहाण केली. किरण गंगाराम खैरनार (वय ३४, रा. सम्राट कॉलनी) दूध विक्री करून उदरनिर्वाह करतो. (old dispute between two families jalgaon news)

रविवारी (ता. ५) सायंकाळी लक्ष्मीनगरातील ललित दीक्षित त्याच्या घरी आला. जुन्या वादातून किरणच्या शर्टाची कॉलर पकडून ‘तू माझ्या भावाला का मारतो’, असे सांगून शिवीगाळ व चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

किरणचा भाऊ हेमंत खैरनार, वहिनी मीनाक्षी खैरनार, आई कमलाबाई खैरनार मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांनाही शिवीगाळ करून ढकलाढकल केली. कमलाबाई खैरनार यांना बाहेर ढकलून दिले. त्यानंतर दगडफेक करून भामट्यांनी पळ काढला.

हेही वाचा : तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

यात चार जण जखमी झाले. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले आहे. किरण खैरनार याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात ललित दीक्षित याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक सुनील सोनार तपास करीत आहे.

टॅग्स :Jalgaonfamily