Jalgaon : धावत्या रेल्वेचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

death news

Jalgaon : धावत्या रेल्वेचा धक्का लागून वृद्धाचा मृत्यू

जळगाव : धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने जखमी झालेल्या ६५ वर्षीय वृध्दाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रकाश नारायण पाटील (वय ६५, रा. राधाकृष्णनगर, जळगाव.) असे मृत वृध्दाचे नाव आहे. (Old man dies afte being hit by running train Jalgaon Latest Marathi News)

शहरातील राधाकृष्णनगरात प्रकाश पाटील कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. शनिवारी (ता. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास सुरत रेल्वे गेट क्रमांक १४८ जवळ रेल्वे रूळ क्रॉस करत असताना बैरानी एक्सप्रेसचा त्यांचा जोरदार धक्का बसला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.