Old Pension Scheme : जुनी पेन्शन मागणीच्या घोषणांनी पाचोरा दणाणले; संप सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old pension scheme govt employees on strike pachora jalgaon news

Old Pension Scheme : जुनी पेन्शन मागणीच्या घोषणांनी पाचोरा दणाणले; संप सुरू

पाचोरा : येथील शहर व तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आरोग्य, महसूल, पंचायत समिती, ग्रामसेवक, तलाठी आदी विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून (ता. १४) जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला असून,

संपकरी कर्मचाऱ्यांनी प्रशासनास निवेदन देण्यासाठी काढलेल्या मोर्चात जुनी पेन्शन योजना (old pension scheme) मागणीच्या दिलेल्या घोषणांनी शहर दणाणले. (old pension scheme govt employees on strike pachora jalgaon news)

कर्मचाऱ्यांना तत्काळ जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून (ता. १४) बेमुदत संप सुरू केला आहे. राज्य सरकारी कर्मचारी, मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र यांनी समन्वय समिती बैठकीत पुकारलेल्या नवीन पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

यासह विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात तालुक्यातील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बेमुदत संपात सहभागी झाले आहेत. यावेळी विविध संघटनांनी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, निवासी नायब तहसीलदार संभाजी पाटील, पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी बी. एस. भालेराव, गटशिक्षणाधिकारी गिरीष जगताप यांना दिले.