Jalgaon News : अमूर्त चित्र प्रदर्शनातून वेगळा अनुभूतीचा आनंद; 28 पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashok Jain inaugurating the picture exhibition of Shivam Hujurbazar. Respected neighbors.

Jalgaon News : अमूर्त चित्र प्रदर्शनातून वेगळा अनुभूतीचा आनंद; 28 पर्यंत प्रदर्शन सुरू राहणार

जळगाव : (स्व.) डॉ. भवरलाल जैन यांच्या पुण्यतिथीनिमित्त चित्रकार व आर्टिस्ट शिवम संजीव हुजूरबाजार याच्या पेंटींग (Painting) चित्र प्रदर्शनाचे शनिवारी (ता. २५) जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष

अशोक जैन यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. (On death anniversary of Bhavarlal Jain an exhibition of paintings by painter artist Shivam Sanjeev Huzurbazar was inaugurated on 25th jalgaon news)

शिवमने रेखाटलेल्या कलाकृतीचे त्यांनी या वेळी कौतुक केले.२५ ते २८ फेब्रुवारीपर्यंत वसंत वानखेडे आर्ट गॅलरी, भाऊंचे उद्यान, काव्य रत्नावली चौकात हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.

आर्टिस्ट शिवम हुजूरबाजार यांचे जळगाव, पुणे, मुंबई येथे नऊ चित्रप्रदर्शने झाले असून, नेहरू आर्ट गॅलरी (वरळी), जहांगीर आर्ट गॅलरी (मुंबई) येथेही पेंटींगचे प्रदर्शन झाले आहे. या अमूर्त पेंटींग प्रदर्शनाचे उद्‌घाटन जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या हस्ते झाले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

२८ फेब्रुवारीपर्यंत हे प्रदर्शन खुले असेल. सर्वांनी चित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे. डॉ. संजीव हुजूरबाजार, जळगाव जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. आरती हुजूरबाजार, कविवर्य ना. धों. महानोर, चित्रकार तरूण भाटे आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी शिवमने रेखाटलेल्या कलाकृतींचे अशोक जैन यांनी कौतुक केले.

आजचे हे चित्रप्रदर्शन वेगळे आहे. अनेक प्रदर्शनांचे आपण आतापर्यंत उद्‌घाटन केले. मात्र, शिवमची ही कलाकृती वेगळी व लक्षवेधी असल्याचे ते या वेळी म्हणाले.

प्रत्येक कलाकृतीतून काहीतरी वेगळे मिळते असे चांगले चित्रकार येथील मातीतून घडले याचा आपणास अभिमान असल्याचेही अशोक जैन म्हणाले. या उपक्रमास नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. सायंकाळी हे चित्र प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

टॅग्स :Jalgaonpainter