Jalgaon News : कॅन्सर, हृदयविकारमुक्त जळगाव अभियान; मंत्री महाजनांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम | On occasion of girish Mahajan birthday Jalgaon campaign free from cancer and heart disease will be implemented news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On occasion of girish Mahajan birthday Jalgaon campaign free from cancer and heart disease will be implemented news

Jalgaon News : कॅन्सर, हृदयविकारमुक्त जळगाव अभियान; मंत्री महाजनांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम

Jalgaon News : ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (girish Mahajan) यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कॅन्सर व हृदयविकारमुक्त जळगाव’ अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती माजी उपमहापौर व भाजपचे नगरसेवक डॉ. अश्‍विन सोनवणे यांनी दिली. (On occasion of girish Mahajan birthday Jalgaon campaign free from cancer and heart disease will be implemented news)

येथील पद्मालय शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपचे सरचिटणीस डॉ. राधेश्‍याम चौधरी, नगरसेवक धीरज सोनवणे, भूषण भोळे, अर्जुन सोनवणे आदी उपस्थित होते.

डॉ. अश्‍विन सोनवणे म्हणाले, की ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांचे आरोग्य क्षेत्रात मोठे कार्य आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘कॅन्सर व हृदयविकारमुक्त जळगाव’ अभियान राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत शहरातील प्रत्येक प्रभागांत मोफत हृदयविकार, कॅन्सर, नेत्रतपासणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ॲन्जिओप्लास्टी, ॲन्जिओग्राफी मोफत करण्यात येईल. कॅन्सरवरील उपचारही करण्यात येतील. मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे करण्यात येईल. यासाठी आरोग्यदूत अरविंद देशमुख यांचे सहकार्य असणार आहे. डॉ. राधेश्‍याम चौधरी यांच्या माध्यमातून महिलांवर मोफत उपचार करण्यात येतील.

१७ मेपासून शहरातील प्रत्येक भागांत तपासणी मोहीम सुरू होणार आहे. याशिवाय गिरीश महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री वृद्धाश्रम, जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्ण, अनाथाश्रम, बालनिरीक्षणगृहात अन्नदानही करण्यात येणार आहे. दिव्यांग मूकबधिरांना बेडशीटवाटप करण्यात येणार आहे.