दीड लाखाच्या गांजाची वाहतूक करणाऱ्याला अमळनेरात पकडले

गांजाची वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे.
cannabis smugglers
cannabis smugglersesakal

अमळनेर (जि. जळगाव) : शहरात गांजाची वाहतूक करताना ताडेपुरा भीमनगर येथील तरुणाला पोलिसांनी रंगेहाथ पकडून त्याच्याजवळून दीड लाखाचा १० किलो गांजा पकडल्याची घटना काल (ता. १६) सायंकाळी पाचच्या सुमारास मंगरूळ येथील माध्यमिक शाळेजवळ घडली.

येथील पोलिस निरीक्षक जयपाल हिरे हे आपले सहकारी किशोर पाटील, मिलिंद भामरे, सूर्यकांत साळुंखे, अमोल पाटील, नीलेश मोरे, कैलास पाटील यांच्यासोबत पालखी बंदोबस्तासाठी यात्रेत असताना मंगरूळ शिरूड फाट्याजवळ एक तरुण विक्रीसाठी गांजा आणत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार श्री. हिरे हे सहकाऱ्यांसह संबंधित ठिकाणी गेले असता, संशयिताला पोलिस येत असल्याची चाहूल लागल्याने तो तेथून पळू लागला. पोलिसांनी पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. संशयित तरुण ताडेपुरा भीमनगर येथील रहिवासी असून त्याचे नाव संतोष अशोक ढिवरे (वय ३५) असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याजवळ १ लाख ५० हजार रुपये किमतीचा १० किलो ३८६ ग्रॅम गांजाची दोन पाकीटे मिळून आली. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, संशयित संतोष ढिवरेला येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीश एम. के. पाटील यांनी २० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

cannabis smugglers
जळगाव : लाचखोर मुख्याध्यापक ACBच्या जाळ्यात
cannabis smugglers
पारोळा बसस्थानकात डोक्यात कचराकुंडी टाकून खून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com