Jalgaon News : अबब! मतदारयाद्यांत दीड लाखावर फोटो अस्पष्ट; निवडणूक विभागातर्फे दुरुस्ती सुरू

one and half lakh photo in voter lists are unclear Correction started by Election Department jalgaon news
one and half lakh photo in voter lists are unclear Correction started by Election Department jalgaon newsesakal

जळगाव : जिल्ह्यात ३४ लाख ६२ हजारांवर मतदार आहेत. मतदार याद्यांमध्ये तब्बल एक लाख ६३ हजार ८८९ मतदारांची छायाचित्रे अस्पष्ट आहेत. (one and half lakh photo in voter lists are unclear Correction started by Election Department jalgaon news)

ही छायाचित्रे काढून त्या जागी मतदारांचे नवीन छायाचित्र टाकण्याचे आदेश राज्य निवडणूक विभागाने जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यानुसार निवडणूक विभागाने संबंधित मतदाराच्या ‘बीएलओ’ (बूथ लेव्हल अधिकारी) मार्फत मतदारांशी संपर्क साधून याद्या अपडेट करण्याचे काम सुरू केले आहे.

आगामी एक ते दीड वर्षात लोकसभा, विधानसभा निवडणूक होतील, असे चित्र आहे. सोबतच जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका, पालिकांच्याही निवडणुका आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने मतदार याद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत.

आयोगाने नुकतेच जळगाव जिल्ह्यातील मतदार याद्यांचे सर्वेक्षण केले. त्यात अनेक बाबींवर बोट ठेवून त्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात ८० वर्षांवरील एक लाख १५ हजार ७१७ मतदार आहेत. त्यांनी जेव्हा मतदारयादीत नाव नोंदविले असेल, तेव्हाचा फोटो अपलोड केला आहे. त्यांचे सध्याचे फोटो अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

one and half lakh photo in voter lists are unclear Correction started by Election Department jalgaon news
Jalgaon News : शासकीय कर्मचारी 14 पासून संपावर; जिल्हाधिकारी कार्यालयात द्वारसभा

मतदारयाद्यांमध्ये पूर्वी एक लाख ८५ हजार मतदारांचे सारखे फोटो होते. त्यात संबंधितांकडून त्यांचेच नाव, फोटोही असल्याची खात्री करून घेत दुसरा फोटो डिलिट करण्यात आला आहे. आता ८१ हजार ५६६ मतदारांचे सारखे फोटो आहेत. ते अपडेट करण्याचे काम सध्या सुरू आहे.

मतदार यादीला आधारकार्ड सिडिंग (लिंक) करण्याचे काम केवळ ४९ टक्के झाले आहे. जळगाव शहरात १८ टक्के मतदारांनी मतदारयादीला आधार सिडिंग केले आहे. सारखी नावे असलेले दोन हजार १२८ मतदार आहेत. त्यांना बोलावून त्यांचीची नावे असल्याची खात्री करून घेतली जात आहे.

"निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अपडेट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार याद्या अपडेट केल्या जात आहेत. मार्च २०२३ ला असलेली मतदारयादी आगामी निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार आहे. याद्या अपडेटची कामे वेगात सुरू आहेत." -तुकाराम हुलवळे, उपजिल्हाधिकारी, निवडणूक शाखा

one and half lakh photo in voter lists are unclear Correction started by Election Department jalgaon news
Jalgaon News : कोविड काळातील गुन्हे मागे घेणार? 77 प्रस्तावांवर चर्चा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com