Jalgaon Crime News : ऑनलाइन गंडा एकाला नेटबॅंकिंगव्दारे तर दुसऱ्यास नोकरीचे आमिष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online Fraud netbanking and other job offer
जळगाव : ऑनलाइन गंडा एकाला नेटबॅंकिंगव्दारे तर दुसऱ्यास नोकरीचे आमिष

जळगाव : ऑनलाइन गंडा एकाला नेटबॅंकिंगव्दारे तर दुसऱ्यास नोकरीचे आमिष

जळगाव : शहरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये ऑनलाइन गंडा घातल्याची घटना घडली पहिल्या घटनेत एकला नेटबॅंकिंगव्दारे ८४ हजारात लुटले तर दुसऱ्या घटनेत पार्टटाइम नोकरीचे आमिष देत दीड लाखांत लुबाडल्याची घटना घडली आहे.

हेही वाचा: कायद्याचा आदर करा नाहीतर दुकान बंद करा; न्यायालयाने ट्विटरला फटकारले

भवानीपेठ येथील रहिवासी तेजस निवृत्ती कासार (वय २८) या तरुणाच्या मोाबाईल क्रमांकावर वेगवेगळ्या दोन मोबाईलवरून सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधला. क्रेडीटकार्ड संदर्भात चौकशी करून संशयितांनी तेजस कासार यांना ‘एनीडेक्स’ हे ॲड्राईड ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याचे सांगितले. कासार यांनी ॲप डाऊनलोड केल्यानंतर सायबर भामट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ऑनलाइन ताबा मिळवून त्यांच्या आयसीआसीआय या बँक खात्यातून ८४ हजार ८८९ रुपये नेटबँकींगद्वारे लंपास केल्याची घटना घडली. बँकखात्यातून आलेल्या एसएमएस नंतर तेजस कासार यांना पैसे लांबवल्याचे निदर्शनास येताच त्यांनी पेालिस ठाणे गाठले. संशयितांच्या मोबाईल क्रमांकाविरुद्ध तक्रार दिल्यावरून अज्ञात भामट्याविरुद्ध शनिपेठ पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे करत आहेत.

हेही वाचा: संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय, आता महिला फाइटर पायलट होणार पर्मनंट

पोलिसांचे आवाहन

नेटबँकिंग, मोबाईलद्वारे ऑनलाइन व्यवहार करताना सजगता पाळण्याची आवश्यकता आहे. कधीच कोणत्याही बँकेतून खातेदाराची माहिती मिळवण्यासाठी ग्राहकाला संपर्क केला जात नाही. सायबर गुन्हेगारांकडून विविध युक्त्या लढवून गंडवण्यात येते. कधी क्रेडीटकार्डचा नंबर मागून तर कधी कुठली तरी लिंक पाठवून त्यावर क्लिक करण्याच्या सूचना देऊन बँक खात्यात झाडू मारला जातो. आता नव्याने आलेल्या ॲड्राईड ॲप्लीकेशन ‘अेनीडेक्स’ डाऊनलोड करण्याचे सांगत मोबाईल फोनचा ऑनलाईन ताबा मिळवून मोबाईलमधील खासगी माहिती, मेल, फोटो, व्हिडीओ कॉपी करू शकता. बँक खात्यातून रक्कम वळती केली जाते. अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांतर्फे करण्यात येत आहे.

Web Title: Online Fraud Netbanking And Other Job Offer

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jalgaoncrimeonline fraud
go to top