Online fraud News | केवायसीच्या नावाने ऑनलाइन लावला चुना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

online fraud

जळगाव : केवायसीच्या नावाने ऑनलाइन लावला चुना

जळगाव : शहरातील गणपतीनगरात राहणाऱ्या एकाची मोबाईल सीमकार्ड ‘केवायसी’च्या नावाखाली ७४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: देशातील रुग्णसंख्या खालावली... पण मृत्यूचा आकडा कायम!

यशोधन अरुण व्यवहारे (वय ४६) यांना गुरुवारी (ता. २७) सायंकाळी ५ वाजता अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला. मोबाईल सिमकार्डच्या केवायसीच्या नावाखाली कागदपत्रांची पूर्तता करण्याचे सांगून ‘कस्टमर केअर’ला संपर्क साधण्याचे सांगितले. त्यानुसार यशोधन व्यवहारे यांनी लागलीत दिलेल्या नंबरवर संपर्क साधला असता समोरून एकाने मोबाईलवर १० रुपयाचे रिचार्ज करण्याचे सांगितले. यासाठी एक ॲपर डाऊनलोड करण्याचे सांगितले. व्यवहारे यांनी ॲप डाऊनलोड केले व १० रुपयाचे रिचार्ज केला.

हेही वाचा: उपजिल्हा रुग्णालयांत सीटी स्कॅन बसविण्यात येणार : मंत्री राजेश टोपे

रिचार्ज केल्याने त्यांच्या बँक खात्यातून १० रूपये कट झाले. काही वेळानंतर त्यांच्या खात्यातून पाच वेळा पैस कट झाल्याचे मॅसेजेस आले. त्याची बँक डिटेल तपासले असता व्यवहारे यांच्या बँकखात्यातून एकूण ७४ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचे दिसून आले. त्यांनी तातडतीने रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक विजय खैरे करीत आहे.

Web Title: Online Fraud Rs 74 Thousand Under The Name Of Mobile Sim Card Kyc

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top