भुसावळ उपविभागामध्ये ऑपरेशन ‘ऑल आउट’ ; ३४ अटक वॉरंट

गुन्हेगारांचे धाबे दणाणले; ३४ अटक वॉरंटची बजावणी
Operation All Out Bhusawal 34 arrest warrants
Operation All Out Bhusawal 34 arrest warrants sakal

भुसावळ : उपविभागातील सर्व पोलिस ठाण्यांतर्गत डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांच्या आदेशानुसार शुक्रवारी (ता. ४) रात्री अकरा ते आज (ता. ५) पहाटे चारपर्यंत ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणे, पाहिजे असणारे आरोपींला ताब्यात घेणे, न्यायालयाने अटक वॉरंट काढलेल्या व्यक्तींना अटक करणे, त्याशिवाय तडीपार गुन्हेगार चेक करणे, हिस्ट्रीशीटर चेक करणे, शहरांमध्ये संशयितरित्या फिरणारे मिळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करणे, आदी विविध प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या.

यावेळी एकूण ३४ अटक वॉरंटची बजावणी करण्यात आली. विविध न्यायालयाने ज्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढले त्यांची बजावणी केली. त्यापैकी काहींना अटक करून न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. याशिवाय एकूण ११ जामीनपात्र वॉरंट बजावणी करण्यात आली तर ६३ समंस बजावणी करण्यात आलेली आहे. दोघांना अटक तर सहा जणांवर गुन्हे शहरात गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोन व्यक्तींना पकडण्यात आले. त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरामध्ये दारू पिऊन फिरणाऱ्या दोन व्यक्तीवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ८४ खाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत दुकाने सुरू ठेवणाऱ्या दोन दुकानदारांवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ३३ खाली कारवाई करण्यात आली आहे.

३२ हिस्ट्री शिटरची तपासणी महाराष्ट्र दारूबंदी कायद्याखाली दोन ठिकाणी धाड टाकण्यात आली. यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. रेकॉर्डवरील पाहिजे असणारे आरोपीदेखील चेक करण्यात आले. याशिवाय शहरातील एकूण ३२ हिस्ट्री शिटर या मोहिमेदरम्यान चेक करण्यात आलेले आहे. यांच्या पथकाने केली कारवाई या कारवाईमध्ये बाजारपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, नशिराबादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मोरे, सहाय्यक पोलिस निरीक्षक दूनगहू, सहाय्यक पोलिस पवार, सहाय्यक पोलिस निरीक्षक धुमाळ, साहाय्यक पोलिस निरीक्षक भोये, पीएसआय महाजन, पीएसआय पाथरवट तसेच सर्व पोलिस स्टेशन अंमलदार व एक आरसीपी पथक सामील होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com