Jalgaon News : पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे काम सुरू; अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Officials and villagers present at the start of concreting of the dam pillar.

Jalgaon News : पाडळसरे धरणाच्या प्रस्तंभाचे काम सुरू; अनिल पाटलांच्या प्रयत्नांना यश

अमळनेर (जि. जळगाव) : तालुक्यातील निम्न तापी प्रकल्प पाडळसरे मुख्य धरणाच्या सांडव्याच्या प्रस्तंभाचे आयआयटी (मुंबई) व मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (नाशिक) यांनी तयार करून दिलेल्या सुधारित संकल्पनानुसार सांडव्याच्या प्रस्तंभाचे काँक्रिटींगचे काम सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. (Padalsare dam pier work is underway jalgaon news)

गेल्या तीन वर्षांपासून आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केलेल्या प्रयत्नांचे हे फलित आहे.

या वेळी प्रकल्प तांत्रिक सल्लागार पी. आर. पाटील, प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता मुकुंद चौधरी, सहाय्यक अभियंता भटुरकर, कनिष्ठ अभियंता मोदीराज, पगारे व ऋतूल सोनवणे, पाडळसे गावाचे माजी सरपंच भागवत पाटील,

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

ग्रामस्थ व कंत्राटदाराचे प्रोजेक्ट मॅनेजर किशोर, अभियंता व स्थानिक पत्रकार वसंतराव पाटील उपस्थित होते. येत्या दोन वर्षांत वरखेडे लोंढे व शेळगाव बॅरेजप्रमाणेच निम्न तापी प्रकल्पाचे सांडव्याचे व धरणाचे उर्वरित बांधकाम पूर्ण करण्याची नियोजन असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Jalgaondam