Jalgaon Crime News : गेंदालाल मिल परिसरातील पेंटरचे घर फोडले | painter house in Gendalal Mill area was robbed by thief jalgaon crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

robbery

Jalgaon Crime News : गेंदालाल मिल परिसरातील पेंटरचे घर फोडले

Jalgaon Crime New : शहरातील गेंदालाल मिल परिसरातील पेंटरचे बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (painter house in Gendalal Mill area was robbed by thief jalgaon crime)

शहर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, मकबूल शहा दगू शहा (वय ३६, रा. आश्रमशाळेसमोर, गेंदालाल मिल) हा पेंटर काम करणारा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे.

मकबूल याचे घर (ता. २० ते २४ एप्रिल) बंद होते. याचा गैरफायदा घेत चोरट्यांनी बंद घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले. मकबूल कुटुंबीयांसह घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी (ता. २५) रात्री ११ वाजता शहर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय निकुंभ करीत आहेत.

टॅग्स :Jalgaonrobberythief