रेल्वे स्थानकावर केंद्रीय समितीने जाणल्या प्रवाशांच्या समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Railways

रेल्वे स्थानकावर केंद्रीय समितीने जाणल्या प्रवाशांच्या समस्या

भुसावळ (जि. जळगाव) : रेल्वेस्थानकावर प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा आणि सुरक्षेची तपासणी करण्यासाठी रेल्वेच्या केंद्रीय प्रवासी सुविधा समितीचे पाच सदस्य गुरुवारी (ता. १२) शहरात आले होते. सकाळी त्यांनी रेल्वेस्थानकला भेट देत सोयी-सुविधांची पाहणी केली. या सुविधाबद्दल समाधान व्यक्त करून पुढील तपासणीसाठी पथक जळगावला रवाना झाले.

या समितीत डॉ. राजेंद्र फडके, विभा अवस्थी (रायपूर), अभिलाष पांडे (जबलपूर), छोटूभाई पाटील (सुरत), कैलास वर्मा (मुंबई) यांचा समावेश होता. पथक येणार असल्यामुळे रेल्वेस्थानक परिसर स्वच्छ करण्यात आला होता. पथकाने कँटीनमधील पदार्थांची चव चाखली. येथील सुविधांची माहिती घेतली. स्थानकावरील विश्रामगृह, खाद्यपदार्थ कॅन्टीन, पिण्याच्या पाण्याची सुविधा, शौचालय आदी ठिकाणी पाहणी केली. प्रवाशांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भुसावळ रेल्वेस्थानकावर लवकरच इतर सुविधाही मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना या समितीने सांगितले. सुरक्षेबद्दल समाधान व्यक्त केले. या वेळी रेल्वे अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. पथकाला प्रवासी कृती समितीने निवेदन दिले. निवेदनात गाड्यांमध्ये प्रवासासाठी तिकीट सुरू करावे, मासिक पास देण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा: जळगाव महापालिकेत कामात कसूर करणाऱ्या 41 कर्मचाऱ्यांना नोटीस

पार्किगमधील असुविधांबद्दल नाराजी

केंद्रीय समितीने रेल्वेस्थानकाच्या उत्तर आणि दक्षिण दोन्ही पार्किंगची पाहणी केली. याठिकाणी आवश्यक त्या सुविधा नसल्याने समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली, तसेच पार्किंगचालकास दंड ठोठावल्याचेही समजते. काही प्रवाशांची चौकशी केली असता, ते विनातिकीट प्रवास करीत असल्याचे आढळून आले. त्यांना आरपीएफच्या ताब्यात देऊन दंडात्मक कारवाईची सूचना केली. अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कडक धोरण राबविण्याच्या सूचना समितीने दिल्या.

हेही वाचा: जळगाव : एरंडोलच्या लोकन्यायालयात 9 लाख 50 हजारांची वसुली

Web Title: Passenger Problems Reported By The Central Committee At Bhusawal Railway Station

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top