Road Construction : रस्त्यांची प्रलंबीत कामे आजपासून सुरू; महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आपआपले रस्ते करणार | pending road work will start from today jalgaon news | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Construction

Road Construction : रस्त्यांची प्रलंबीत कामे आजपासून सुरू; महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आपआपले रस्ते करणार

Jalgaon Road Construction : शहरातील रस्त्यांची कामे अपूर्ण आहेत, काही रस्त्यांचे सीलकोट बाकी आहेत. त्यांचे काम आता गुरूवार (ता. १४)पासून सरू होणार आहेत.

महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे कामासाठी जे रस्ते आहेत, ते आपआपली कामे सुरू करणार आहेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी दिली. (pending road work will start from today jalgaon news)

शहरातील रस्ते, तसेच इतर कामांसंदर्भात महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी (ता. १३) संयुक्त बैठक झाली. त्याबाबत माहिती देताना आयुक्त डॉ. गायकवाड म्हणाल्या की, शहरातील काही रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. तर काही रस्त्यांची कामे महापालिकेकडे आहेत.

या सर्व कामांचा या बैठकीत आढावा घेऊन कामे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांच्याकडे जे रस्ते असतील, त्यांनी ती कामे आता सुरू करावयाची आहेत. ही कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापालिकेअंतर्गत जी रस्त्याची कामे आहेत, ती गुरूवारपासून सुरू करण्याबाबत मक्तेदारांना आदेश देण्यात आले आहेत. काही भागांत डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी मुरूम टाकणे गरजेचे आहे, त्या ठिकाणी मुरूम टाकण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गणेश विसर्जन मार्गाला प्राधान्य

शहरातील रस्त्यांबाबत आयुक्त म्हणाल्या, गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठी महापालिकेच्या शहर अभियंत्यांना आदेश देण्यात आले आहे. ते कामही लवकरच सुरू करण्यात येणार आहे.