लैंगिक सुखाच्या मागणीचा छळ झाला असह्य; पोलिसांत गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Crime News

लैंगिक सुखाच्या मागणीचा छळ झाला असह्य; पोलिसांत गुन्हा दाखल

जळगाव : मुळ औरंगाबाद येथील रहिवासी तसेच उच्चशिक्षणासाठी (Higher education) शिक्षण घेत असलेल्या तरूणीला लैंगिक सुखाची (Sexual pleasure) मागणी करत तिचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आली असून चौघांना अटक करण्यात आली आहे. (Persecution for seeking sexual pleasure is unbearable Case filed against 4 jalgaon crime News)

पोलिसांत दाखल तक्रारीत नमुद केल्या प्रमाणे, १९ वर्षीय पिडीत विद्यार्थीनी औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी आहे. जळगाव शहराती ती उच्चशिक्षणासाठी आली असून बुधवार (ता.११ते १३ मे) दरम्यान पिडीत मुलीला देवेंद्र भागवत पाटील (वय-२१ रा. नायगाव ता.यावल), अजय मनोज माळी (वय-२० रा. तळेगाव ता. जामनेर), कमलेश भटू भामरे (वय-१९ रा. सुराजय ता. शिंदखेडा जि.धुळे) आणि अभिषेक रमेश बाविस्कर (वय-१९ रा. फर्दापूर ता. सोयगाव जि. औरंगाबाद) यांनी वेळोवेळी तरूणीशी अंगलट करत उघडपणे लैंगिक सुखाची मागणी करत होते. या छळाला कंटाळून तरूणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा: 40 हजारावर प्रॉपटी करपट्टी विना; करवसुलीसाठी 3 महिन्याचा अल्टिमेटम

त्रास असह्य...

पिडीतेने नमुद केल्या नुसार, संशयीतांचा गेल्या काही दिवसांपासुन त्रास सुरु असून त्यांनी छेडखानी नंतर छळाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. महाविद्यालय आवारात उघड उघडपणे लैंगिक सुखाची मागणी हेात असल्याने पिडीत विद्यार्थींनी मेटाकुटीस आली असून तिने अखेर पेालिसांत तक्रार दिल्यावरुन विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: नाशिक : ग्रामीण भागात भूगर्भातील जल पातळी वाढविणार

Web Title: Persecution For Seeking Sexual Pleasure Is Unbearable Case Filed Against 4 Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top