Latest Marathi News | जळगाव : विहीर बांधण्यासाठी पत्नीचा छळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Persecution of wife

जळगाव : विहीर बांधण्यासाठी पत्नीचा छळ

जळगाव : शेतात विहीर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणावे, यासाठी पत्नीचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. म्हसावद (ता. जळगाव) येथील माहेरवाशिण मोहिनी विनेाद बोरसे (वय ३६) यांच्या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे, त्यांचा विवाह आंबोळा (जि. धुळे) येथील विनोद चिंतामण बोरसे यांच्याशी झाला आहे.

हेही वाचा: MPSCकडून आंदोलकांवर होणार कारवाई; आयोगाचा संघटनांना इशारा

लग्नानंतर काही दिवस चांगले वागवल्यानंतर पती व सासरच्या मंडळीने विविध कारणाने त्रास देण्यास सुरवात केली. शेतात विहीर तसेच घर बांधण्यासाठी, माहेरून पैसे आणावे, म्हणून विवाहितेचा छळ करण्यात येत असल्याने पीडितेने माहेर गाठत तक्रार केल्यावरून पतीन विनोद, सासू लताबाई, जेठ प्रवीण, शोभाबाई, दिर अनिल, नणंद संगीता अशांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक स्वप्नील पाटील करत आहेत.

हेही वाचा: जळगाव : सतरा वर्षीय मुलीस फूस लावून पळवले

Web Title: Persecution Of Wife For Money Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..