
Jalgaon News : मेहुणबारे पोलिस ठाण्यांतर्गत आता पिलखोडला नवे दूरक्षेत्र
मेहुणबारे (जि. जळगाव) : जिल्ह्यातील १० पोलिस ठाण्यांचे विभाजन करण्याचा निर्णय जिल्हा पोलिस प्रशानाने घेतला आहे. यात नवीन स्थानके वा दूरक्षेत्र यांची निर्मिती करण्यात येणार आहे. (Pilkhod is now new remote area under Mehunbare Police Station jalgaon news)
या निर्णयानुसार मेहुणबारे पोलिस ठाण्यांतर्गत पिलखोड येथे दूरक्षेत्र होणार आहे. या दूरक्षेत्रामुळे पिलखोड पसिसरातील कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी होणारी कसरत थांबेल.
मेहुणबारे पोलिस ठाण्याची स्थापना १९५१ मध्ये झाली. तेव्हा १७ पदे मंजूर होती. या ठाण्यांतर्गत सुमारे ५६ खेडी येतात.
त्यातही काही गावे कायमची संवेदनशील. काही गावे १५ ते २० हजार लोकसंख्या आहे. ५६ खेड्यांमध्ये कायदा व सुव्यवस्था सांभाळणे तसे जिकरीचे काम मात्र कोणतीही कुरकुर न करता पोलिस बांधव सदनिग्रहणाय, खलनिग्रहणायची भूमिका पार पाडत आहेत. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे.
हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण
मात्र पोलिस ठाण्यातील मंजूर पदे १७ वरून सध्यस्थितीत एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, दोन उपनिरीक्षक व ३२ पोलिस कर्मचारी असे पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. म्हणजे ५६ गावांसाठी केवळ ३६ पोलिस कर्मचारी दिवसरात्र तैनात आहेत. अपुऱ्या पोलिस बळामुळे गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.
कायदा व सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांची अक्षरश: दमछाक होते. काही अनुचित प्रकार घडला तर बाहेरून पोलिस बंदोबस्त मागवावा लागतो. त्यातच दररोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटना व त्यांचा तपास यातच पोलिस यंत्रणा गुरफटून जाते.
या ५६ खेड्यांची लोकसंख्या २०१७ च्या जनगणनेनुसार तब्बल २ लाख ४६ हजार ४९३ इतकी आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दुसऱ्या पोलिस ठाण्यातून कुमक मागवावी लागते. या पार्श्वभूमीवर या पोलिस ठाण्याचे अंतर्गत पिलखोड येथे दूरद्वक्षेत्राची मागणी अनेक वर्षापासून होत होती.