Jalgaon Crime News : 2 जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime news

Jalgaon Crime News : 2 जुगार अड्ड्यांवर पोलिसांची कारवाई

जळगाव : शहरातील सिंधी कॉलनीतील भाजी मार्केट व विटनेर (ता. जळगाव) येथे सट्टा जुगार खेळणाऱ्यांवर एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा टाकून रोकड व सट्टा जुगारचे साहित्य हस्तगत केले. (Police action on 2 gambling dens Jalgaon Crime News)

सिंधी कॉलनीतील चेतनदास हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या भाजी मार्केटच्या तळमजल्यात एमआयडीसीचे पोलिस कर्मचारी सचिन मुंढे, सिद्धेश्वर डापकर, सिद्धश्वर लटपटे, विकास सातदिवे यांनी छापा टाकून सट्टा खेळविणारे राजीव बाबुराव कुमावत (वय ४९, रा. नेहरुनगर) व राजीव बाबूराव पवार (४२, रा. शिरसोली रोड) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून दोन हजार ७७० रुपयांचा ऐवज हस्तगत केला. हा अड्डा सुरेश सीताराम भाट (रा. कंजरवाडा) यांच्या सांगण्यावरून खेळवित असल्याचे संशयितांनी सांगितले. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

दुसऱ्या घटनेत विटनेर बसस्थानकाच्या मागे सार्वजनिक ठिकाणी एमआयडीसी पोलिस कर्मचारी हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्वप्नील पाटील यांनी छापा टाकून सट्टा खेळविणारा डिंगबर प्रभाकर काळे (वय ३५)याला ताब्यात घेतले.

त्याच्याकडून सट्टा जुगाराच्या साहित्यासह एक हजार १५० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. त्याच्याविरुद्ध पोलिस कर्मचारी हेमंत पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. Remarks : सट्टा अड्ड्यावर छापेमारी