Jalgaon Crime News : शेतीच्या हिस्स्यावरून सख्या भावंडांने केले आत्महत्येस प्रवृत्त | police case filed against person two brothers for doing suicide jalgaon crime | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Death News

Jalgaon Crime News : शेतीच्या हिस्स्यावरून सख्या भावंडांने केले आत्महत्येस प्रवृत्त

Jalgaon News : ‘वडिलोपार्जित शेजजमिनीत भावांनी हिस्सा न दिल्यामुळे कर्ज भरू शकलो नाही. भावांनी हिस्सा दिला असता, तर ती जमीन विकून कर्ज फेडले असते’, असे मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करून रिक्षाचालक संजय चावदस सपकाळे (वय ५८, रा. कासमवाडी) यांनी मंगळवारी (ता. २३) असोदा रेल्वेगेटजवळ धावत्या खाली झोकून आत्महत्या केली होती. (police case filed against person two brothers for doing suicide jalgaon crime)

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांच्या दोन भावांविरुद्ध बुधवारी (ता. २४) दुपारी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

संजय सपकाळे यांच्या पत्नीला त्यांचा भाऊ गजानन सोनवणे याने भ्रमणध्वनीवरून मेहुणे रेल्वेखाली येऊन मृत झाल्याचे सांगितले. त्यांनी मरण्यापूर्वी मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केले होते. ती रेकॉर्डिंग गजानन सोनवणे यांनी बहिणीला ऐकविली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

भावाने मला हिस्सा न दिल्याने मी कर्ज भरू शकलो नाही. आधार सपकाळे, शांताराम सपकाळे व इतर काही लोकांमुळे मी आत्महत्या करीत आहे. व्याजाने पैसे घेतल्याने सावकार अण्णा ठाकूर व नीलेश ठाकूर यांनी मला मारहाण केली. यात माझा हात मोडून टाकला असल्याचे रेकॉर्डिंगमध्ये म्हटले आहे.

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मृताची पत्नी कल्पना सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आधार चावदस सपकाळे व शांताराम चावदस सपकाळे यांच्याविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.