माजी आमदार साहेबराव पाटलांची घरवापसी; राष्ट्रवादीत प्रवेश करत भाजपाला केला राम राम !

sahebrav patil
sahebrav patil

जळगाव ः जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथराव खडसेंनी भाजपाला राम राम करून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीत गेल्यानंतर अनेक खडसे समर्थक भाजपाचे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तसेच खानदेशातील भाजपचे नेते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती. त्यानूसार आज अमळनेरचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.  

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बदलत असून आज अमळनेरचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनी जनसंवाद यात्रे प्रसंगी अमळनेर येथे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांच्या सोबतच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अॅड. ब्रम्हे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

साहेबराव पाटलांची पून्हा घरवापसी
अमळनेरचे माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील हे अपक्ष म्हणून विधानसभेवर निवडणून आले होते. नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. परंतू त्यांनी नंतर राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला. परंतू आता पून्हा त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांची पून्हा घरवापसी झाली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com