esakal | खडसेंना कोणता कोरोना झालायं; त्याच संशोधन झाले पाहिजे !
sakal

बोलून बातमी शोधा

खडसेंना कोणता कोरोना झालायं; त्याच संशोधन झाले पाहिजे !

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा ससंर्ग वाढत असून दररोज नविन रुग्णांची संख्या वाढत आहे.

खडसेंना कोणता कोरोना झालायं; त्याच संशोधन झाले पाहिजे !

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव ः एकदा कोरोना झाल्यावर पून्हा सहसा कोरोना होत नाही, पण एकनाथ खडसेंना दोनदा नाही तिसऱ्यांदा कोरोना झाला आहे. त्यामुळे खडसेंना झालेल्या कोरोनावर संशोधन होण्याची गरज आहे, अशा खोचक टिका भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांनी केली.

आवश्य वाचा- जळगावात कोरोनाचे नियम होणार ‘कडक’; लग्न, सभांमध्ये छापे टाकले जाणार 
 

जळगाव शहरातील सुप्रीम कॅालनी येथील अमृत जलवाहिनी योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रम प्रसंगी ते पत्रकारांशी गिरीश महाजन बोलत होते. महाजन म्हणाले, की जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा ससंर्ग वाढत असून दररोज नविन रुग्णांची संख्या वाढत आहे. पण एकनाथ खडसेंना तिऱ्यांदा कोरोना झाला आहे, त्यामुळे त्यांची चिंता वाटत आहे. 

खडसेंच्या कोरोना बाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली
दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एकनाथ खडसेंना तिसऱ्यांदा कोरोना झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे खडसेंना झालेल्या कोरोनाचा नेमका कोणता प्रकार आहे यावर संशोधन होण्याचे गरज असल्याचे ते म्हणाले.

गिरीशभाऊंचे आभार : खडसे 
तीनदा नव्हे पण दोन वेळा माझा अहवाल पॉझिटिव्ह आला आणि या दोन्ही वेळेस मी बाँबे हॉस्पिटलला ॲडमिट होतो. आताही उपचार सुरू आहेत. त्यामुळे संशोधन करायचे असेल तर त्यांनी जरूर करावे. माझ्याबदल काळजी व्यक्त केल्याबद्दल गिरीश महाजनांचे आभार. 
-एकनाथ खडसे, माजी मंत्री 

loading image