esakal | अहो आश्‍चर्यम‌ ! महापौरांचा गौरव..तोही शिवसेनेकडून  

बोलून बातमी शोधा

अहो आश्‍चर्यम‌ ! महापौरांचा गौरव..तोही शिवसेनेकडून  

शेवटची महासभा असल्याने आज शिवसेनेच्या सदस्यांनी महापौर भारती सोनवणे यांचा चांगल्या कामाबद्दल अनोख्या पद्धतीने सत्कार केला.

अहो आश्‍चर्यम‌ ! महापौरांचा गौरव..तोही शिवसेनेकडून  
sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : राज्यातील कट्टर विरोधक असलेल्या भाजप-शिवसेनेत जळगाव महापालिकेच्या महासभेत मात्र तात्पुरते का होईना सख्य दिसून आले. पालिकेत भाजपची सत्ता असून, एरवी महासभेतून खडाजंगी पाहायला मिळत असताना शुक्रवारच्या सभेत शिवसेना सदस्यांनी चक्क महापौरांचा ढोल-ताशांच्या गजरात सत्कार केला.

आवश्य वाचा- आधी पायी चालून केली खात्री, मग टाकली धाड आणि जप्त केली विदेशी दारूचा साठा 

जळगाव महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आहे. पहिल्या महापौर सीमा भोळे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर महापौरपदी भारती सोनवणे यांची निवड झाली होती. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दोन महिन्यांतच कोरोना महामारी, तसेच लॉकडाउनचे संकट आले होते. अशा संकटातही त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. महापौर भारती सोनवणे यांचा कार्यकाळ संपत असून, त्यांची आज शेवटची महासभा असल्याने आज शिवसेनेच्या सदस्यांनी महापौर भारती सोनवणे यांचा चांगल्या कामाबद्दल अनोख्या पद्धतीने सत्कार केला. महासभा सुरू होण्यापूर्वी महापौर दालन ते सभागृहापर्यंत त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. 

सन्मानपत्र देऊन गौरव 
जळगाव शहरातील विविध रखडलेले कामे मार्गी लावणे, कोरोना काळात रस्त्यावर उतरून केलेले काम, शहरातील विकासकामांसाठी निधीचा पाठपुरावा करून निधी मंजूर आदी विकासकामांबाबत शिवसेना सदस्यांनी महापौर भारती सोनवणे यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला. या वेळी शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी, ज्येष्ठ सदस्य नितीन लढ्ढा, नगरसेवक प्रशांत नाईक, नितीन बरडे, गणेश सोनवणे आदी सदस्यांनी सत्कार केला. राज्यात दोन्ही पक्षांमधून विस्तवही जात नसताना जळगाव पालिकेतील दृश्य मात्र वेगळे दिसून आले. 

आवर्जून वाचा- बिबट्याची शेतकऱ्यांमध्ये दहशत;वनकराई शिवारात रात्रीची गस्त 
 


मुदतवाढीची अपेक्षा 
भारती सोनवणेंचा कार्यकाळ संपत असून, नव्या महापौर निवडीचे वेध लागले आहेत. त्यासाठी भाजपतून अनेक जण इच्छुक असून, त्यांची मोर्चेबांधणीही सुरू झाली आहे. मात्र, हा सत्कार करताना शिवसेना सदस्यांनी अत्यंत हुशारीने भारती सोनवणे यांना मुदतवाढ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करत भाजपतच धुसफूस निर्माण केल्याचे बोलले जात आहे