Jalgaon News : ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडव्याला मिळणार; 6 लाखांवर कार्डधारकांना लाभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ration Card Adhar card

Jalgaon News : ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडव्याला मिळणार; 6 लाखांवर कार्डधारकांना लाभ

जळगाव : गरीबांना मराठा नवीन वर्षाला महागाईची झळ नको, म्हणून राज्य (State) शासनाने १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ (रवा, डाळ, साखर, तेल) मिळणार आहे. (Poor people dont want inflation on Marathi New Year so state government will supply happiness ration jalgaon news)

सोबत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तही आनंदाचा शिधा मिळेल. त्यासाठी मात्र कार्डधारकांना रेशनकार्ड आधारकार्डाशी लिंक करून घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिली.

राज्य मंत्रिमंडळाने याबाबत निर्णय घेतला आहे. राज्यातील एक कोटी ६३ लाख शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे. गेल्या दिवाळीत ‘आनंदाचा शिधा’ देण्यात आला होता. हा आनंदाचा शिधा देण्यासाठी आवश्यक जिन्नसांची खरेदीसाठी ‘महाटेंडर्स’ या ऑनलाइन २१ दिवसांऐवजी १५ दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

काहींना शिधा दिवाळीत, तर काहींना दिवाळीनंतर ‘आनंदाचा शिधा’ मिळाला होता.
‘आनंदाचा शिधा’ पाकिटावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे छायाचित्र नव्हते. यामुळे ती पाकीटे परत मागविली होती, तर काही ठिकाणी साखर, तेल न मिळताच शिधावाटप झाला होता. यामुळे ‘आनंदाचा शिधा’ चांगलाच गाजला होता.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

आता परत ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतल्याने रेशन कार्डधारकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब कर्डधारकांना याचा लाभ मिळणार आहे. त्यानुसार प्राधान्य गटात चार लाख ९० हजार ६४०, अंत्योदय एक लाख ३४ हजार ३५७ कार्डधारक, अशा एकूण सहा लाख २४ हजार ९९७ कार्डधारकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे.

"शासनाच्या निर्णयानुसार येत्या गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात सहा लाखांवर कार्डधारकांना आनंदाचा शिधा प्रत्येकी १०० रुपयांत वाटप होणार आहे. मात्र, त्यासाठी लाभार्थ्यांनी आधारकार्ड लिंक करण्याची गरज आहे." -सुनील सूर्यवंशी, जिल्हा पुरवठा अधिकारी